
मुंबई, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। इंटेरियो बाय गोदरेज, या गोदरेज एंटरप्रायजेस समूहाच्या आघाडीच्या फर्निचर ब्रँडने ‘सोशल ऑफिस रिइमॅजिन्ड – रिअलिटी ऑफ हायब्रीड वर्कप्लेसेस’ या अद्ययावत संशोधन अहवालातील निरीक्षणे प्रकाशित केली आहेत. सर्जनशीलता आणि सहकार्यामध्ये प्रत्यक्ष ऑफिसेसची भूमिका नेमकी काय असते हे समजून घेण्यासाठी इंटेरियोमधील वर्कस्पेस अँड अर्गोनॉमिक् रिसर्च सेलने देशभरातून एक अभ्यास अहवाल तयार केला. यामधे येणारी आव्हाने शोधून त्यावर योग्य उपाययोजना सुचवण्याचा या अहवालाचा उद्देश होता. भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील ५० ऑफिसमधे काम करत असलेल्या ३५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या अहवालात त्यांच्या कामाचे पॅटर्न्स, त्यांच्या गरजा, ऑफिसमधे काम करत असतानाच्या त्यांच्या अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याशिवाय यात ‘सोशल ऑफिस २.०’ ही संकल्पना मांडण्यात आली असून त्यात हायब्रीड वर्कप्लेसेसमधे प्रचलित असलेल्या ५ वैविध्यपूर्ण टायपॉलॉजीजचा समावेश आहे.
या अहवालानुसार भारतातील कर्मचारीवर्ग आज दोन वेगळ्या मॉडेल्सनुसार विभागला गेला आहे – ४२.१ टक्के कर्मचारी केवळ ऑफिसमधून काम करतात, १०.५ टक्के घरातून काम करतात, तर ४७.४ टक्के दोन्ही प्रकारांत काम करतात. त्यांची पसंती विचारल्यावर कर्मचाऱ्यांनी टीमबरोबर करायच्या कामासाठी ऑफिसची निवड केली. नव्याने भरती झालेल्यांपैकी ७७ टक्के जण आणि ७५ टक्के ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी टीम कोलॅबरेशन, मार्गदर्शन आणि नेटवर्किंगसाठी ऑफिसला पसंती दिली.
या निरीक्षणांविषयी इंटेरियो बाय गोदरेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि बीटुबी व्यवसायाचे प्रमुख समीर जोशी म्हणाले, ‘हायब्रीड वर्क हा केवळ एक ट्रेंड राहिला नसून, ते नवे वास्तव ठरले आहे. आमचे संशोधन असे सांगते, की कर्मचाऱ्यांना ऑफिस हे केवळ काम करण्याचे ठिकाण असू नये असे वाटते. त्यांना एकाग्रतेनं काम करण्यास पूरक वातावरण, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, टीमवर्कसाठी वेगळ्या जागा आणि सोशल ठिकाणे असावीत असेही वाटते. इंटेरियोमधे आम्ही कंपन्यांना लवचिक, तंत्रज्ञान तसेच उत्पादनक्षमता व परस्पर सहकार्याला पूरक ऑफिस तयार करण्यासाठी प्रोत्साहन देतो. आम्हाला मानवकेंद्रित वर्कस्पेसेस तयार करणाऱ्या उपाययोजनांना चांगली मागणी असून आर्थिक वर्ष २६ मधे हे क्षेत्र २५ टक्क्यांनी वाढेल असा आमचा अंदाज आहे.’
या अहवालात आधुनिक वर्कप्लेसेससाठी जागांचे तीन प्रमुख प्रकार नमूद करण्यात आले आहेत. एकाग्रतेनं काम करण्यासाठीच्या इमर्सिव्ह स्पेसेस, ज्यासाठी ५७.९ टक्के कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक उत्पादनक्षमतेसाठी खास वर्कस्टेशन्स असावीत असे सांगितले. दुसरा प्रकार म्हणजे, परस्पर सहकार्यासाठी इंटरअक्टिव्ह स्पेसेस, ज्याचा लाभ ५७. मार्गदर्शन व प्रशिक्षण उपक्रमांसाठी होईल असे ९ टक्के जणांनी सांगितले. तिसरा प्रकार म्हणजे, सोशल कोर्टयार्ड्स जे कम्युनिटी बिल्डिंगसाठी महत्त्वाचे ठरेल असे मत ८४.२ टक्के जणांनी नोंदवले. विशेष म्हणजे, ८९.५ टक्के जणांनी त्यांची ऑफिसेस पारंपरिक कॉर्पोरेट वातावरणापेक्षा घराप्रमाणे आरामदायी तसेच आपलीशी वाटणारी असावीत असे नमूद केले.
या अहवालानुसार कर्मचाऱ्यांची कामाची पद्धत बदलली असली, तरी केवळ २९.४ टक्के ऑफिसेसनी गेल्या तीन वर्षांत आवश्यक बदल केल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. मात्र, ७३.७ टक्के जणांनी गोंगाटामुळे कामावर लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत महत्त्वाचे आव्हान कायम असल्याचे सांगितले. कंपन्यांनी हायब्रीड वर्क मॉडेल्सचा अवलंब केला असला, तरी बहुतेकांनी नव्या वास्तवानुसार प्रत्यक्ष जागेत बदल केलेले नाहीत. या संशोधनानुसार ऑफिसेसनी पारंपरिक मांडणी बदलून उत्पादनक्षमता, परस्पर सहकार्य, कर्मचाऱ्यांचे आरोग्य अशा बाबी लक्षात घेऊन आधुनिक वर्कप्लेसेस तयार करणे गरजेचे झाल्याचे निरीक्षण ठळकपणे मांडले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule