
मुंबई, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। जर्मन लक्झरी कार उत्पादक ऑडीनं भारतात आपल्या लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल्स क्यू3 आणि क्यू5 ‘सिग्नेचर लाइन’ लाँच केलं आहे. ही विशेष आवृत्ती 52.31 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) उपलब्ध असून, यात प्रीमियम फिनिशिंग, विशेष डिझाइन एलिमेंट्स आणि अनेक नवी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या नव्या अपग्रेडमुळे ऑडीच्या एसयूव्ही मॉडेल्सना अधिक आकर्षक आणि सोफिस्टिकेटेड लुक मिळाला आहे.
क्यू3 सिग्नेचर लाइनची किंमत 52.31 लाख रुपये असून, क्यू5 सिग्नेचर लाइन 69.86 लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच क्यू3 स्पोर्टबॅक व्हेरिएंटची किंमत 53.55 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही दोन्ही मॉडेल्स ‘टेक्नॉलॉजी’ व्हेरिएंटसह उपलब्ध असून, ऑडीच्या जेन्युईन अॅक्सेसरीज पॅकेजचा भाग म्हणून सादर करण्यात आली आहेत.
सिग्नेचर लाइन अंतर्गत एक्सटिरियरमध्ये इल्यूमिनेटेड ऑडी रिंग्स, एंट्री एलईडी लॅम्प्स, स्पेशल डेकल्स आणि डायनॅमिक व्हील हब कॅप्स देण्यात आले आहेत, जे गाडीच्या गतीनुसार ऑडी लोगोला योग्य दिशेत ठेवतात. इंटिरियरमध्ये केबिन फ्रेग्रन्स डिस्पेन्सर, मेटॅलिक की कव्हर आणि स्टेनलेस स्टील पेडल सेट यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली असून, प्रवास अधिक लक्झरी आणि आरामदायक बनतो.
क्यू3 सिग्नेचर लाइनमध्ये पार्क असिस्ट प्लस, 18-इंच 5-व्ही-स्पोक (एस डिझाइन) अलॉय व्हील्स, मागील सीटसाठी 12-व्होल्ट आउटलेट आणि दोन यूएसबी पोर्ट्सचा समावेश आहे. तर क्यू5 सिग्नेचर लाइनमध्ये 19-इंच 5-ट्विन-आर्म ग्रेफाइट ग्रे ग्लॉस टर्न्ड अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे कारचा लूक अधिक स्पोर्टी दिसतो.
ऑडी क्यू3 ही 2.0 लिटर टीएफएसआय इंजिनसह 190 एचपी पॉवर देणारी कॉम्पॅक्ट लक्झरी एसयूव्ही असून, 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्स आणि क्वाड्रा ऑल-व्हील ड्रायव्ह सिस्टममुळे शहरी आणि ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी उपयुक्त आहे. तर क्यू5 ही 2.0 लिटर इंजिनसह २४८- 2६९ एचपी पॉवर देणारी मिड-साइज एसयूव्ही असून, कुटुंबासाठी आदर्श पर्याय ठरते. दोन्ही मॉडेल्समध्ये व्हर्च्युअल कॉकपिट, एमएमआय टच रिस्पॉन्स आणि अॅडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारखी अत्याधुनिक तंत्रज्ञान वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि जग्वारसारख्या प्रतिस्पर्ध्यांमधील तीव्र स्पर्धेत ऑडीची ही ‘सिग्नेचर लाइन’ लक्झरी कार मार्केटला नवा आयाम देणारी ठरते. ऑडी इंडियाचे प्रमुख जोझेफ मार्को यांनी सांगितले की, “सिग्नेचर लाइन ही आमच्या ग्राहकांसाठी एक विशेष भेट आहे, जी ऑडीच्या डिझाइन तत्त्वज्ञानाचं प्रतीक आहे आणि आमच्या एसयूव्ही लाइनअपला अधिक वैविध्यपूर्ण बनवते.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule