अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा शटडाऊन अखेर संपला
वॉशिंग्टन , 13 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेले “शटडाउन” अखेर संपले आहे. बुधवारी अमेरिकन काँग्रेसने शटडाउन संपविणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी केली. यानंतर सलग 43 द
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा शटडाऊन अखेर संपला


वॉशिंग्टन , 13 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेले “शटडाउन” अखेर संपले आहे. बुधवारी अमेरिकन काँग्रेसने शटडाउन संपविणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी केली. यानंतर सलग 43 दिवस चाललेले शटडाउन संपुष्टात आले.

शटडाउन संपविण्यासाठी झालेल्या करारानुसार, या 43 दिवसांच्या काळात कामावरून काढण्यात आलेल्या फेडरल कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर बहाल केले जाईल. प्रतिनिधीगृहात सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने हे विधेयक 222 विरुद्ध 209 मतांनी मंजूर केले. सिनेटने आधीच या विधेयकाला मान्यता दिली होती आणि आता राष्ट्रपती ट्रम्प यांच्या स्वाक्षरीने ते कायदा बनले आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांनी या विधेयकाच्या मंजुरीला “मोठा विजय” असे संबोधले. डेमोक्रॅटिक पक्ष “आर्थिक आरोग्यसेवा कायदा” अंतर्गत मिळणाऱ्या आरोग्य कव्हरेजसाठी कर सवलत वाढवण्याची मागणी करत होता. ही कर सवलत या वर्षाच्या शेवटी संपुष्टात येणार होती. जर सरकारने ती वाढवली नसती, तर लोकांना मिळणारे आरोग्य कव्हरेज अधिक महाग झाले असते. हाच मुद्दा दोन्ही पक्षांमध्ये वादाचा विषय ठरला आणि त्यामुळेच शटडाउन इतके लांबले. मात्र शेवटी रिपब्लिकन पक्ष मागे हटला नाही आणि डेमोक्रॅटिक पक्षालाच झुकावे लागले.शटडाउन संपविण्यासाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांदरम्यान झालेल्या करारानुसार, आता 31 जानेवारी 2026 पर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय सरकारी कामकाज सुरू राहील.

या कराराच्या अंतर्गत तीन वार्षिक खर्च विधेयकांना वित्तपुरवठा करण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाने आरोग्यसेवा अनुदान वाढविण्यासाठी डिसेंबरच्या मध्यापर्यंत मतदान घेण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र त्याच्या यशाची कोणतीही हमी दिलेली नाही.या विधेयकाअंतर्गत शटडाउन सुरू झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने फेडरल कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्यात आला आहे. तसेच या करारामुळे फेडरल कर्मचाऱ्यांना जानेवारीपर्यंत कोणतीही नवीन कपात होणार नाही, आणि शटडाउन संपल्यानंतर त्यांना थकीत वेतन देखील दिले जाईल, याची हमी देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande