
रत्नागिरी, 15 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात चार नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष आणि सदस्यपदाकरिता आजपर्यंत एकंदर 121 उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि राजापूर या चार नगरपालिका आणि गुहागर, देवरूख तसेच लांजा या तीन नगरपंचायतींसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आजपर्यंत एकंदर 121 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यांचा तपशील असा (कंसातील आकडे नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या अर्जांचे) : रत्नागिरी २० (०), चिपळूण ३० (५), खेड ७ (१), राजापूर ४ (१), गुहागर १२ (१), देवरुख २४ (१), लांजा १४ (१).
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी