धारूर नगर परिषदेत भाजप निश्चित विजय मिळवेल - सुरेश धस
बीड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हा निवडणूक प्रमुख आमदार सुरेश धस यांनी केले आहे. दुसरीकडे भाजप नक्कीच यश मिळवे
बीड


बीड, 16 नोव्हेंबर (हिं.स.)।

धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हा निवडणूक प्रमुख आमदार सुरेश धस यांनी केले आहे. दुसरीकडे भाजप नक्कीच यश मिळवेल असे त्यांनी सांगितले

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून धारुर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

निवडणुकीत संघटन अधिक सक्षम कसे होईल, स्थानिक प्रश्नांना नेमकेपणाने कशी दिशा देता येईल,प्रचारयंत्रणा प्रभावी कशी होईल,याबाबत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.

या बैठकीला डॉ. स्वरूपसिंह हजारी, विक्रांत हजारी, संतोष बप्पा सिरसट, शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोतरे, मोहन भोसले, बालू चव्हाण, बाळू खामकर तसेच धारूर येथील कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande