भायखळ्यात पायाभरणीच्या कामादरम्यान दुर्घटना; दोन कामगारांचा मृत्यू, तीन जखमी
मुंबई, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। मुंबईच्या भायखळा परिसरातील हबीब मेन्शन येथे सुरू असलेल्या इमारतीच्या पायाभरणीच्या कामादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी ही घटना घडली. पायाभरणी आणि म
Accident during foundation work in Byculla


मुंबई, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। मुंबईच्या भायखळा परिसरातील हबीब मेन्शन येथे सुरू असलेल्या इमारतीच्या पायाभरणीच्या कामादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी ही घटना घडली. पायाभरणी आणि माती ढिगाऱ्याच्या कामादरम्यान अचानक मोठ्या प्रमाणात माती व चिखल कोसळून पाच कामगार त्याखाली दबले. इतर सहकाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत सर्वांना बाहेर काढले.

जखमी कामगारांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान राहुल (वय ३०) आणि राजू (वय २८) यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्राधिकाऱ्यांनी दिली. उर्वरित तिघांवर—सज्जाद अली (२५), सोबत अली (२८) आणि लाल मोहम्मद (१८) यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बांधकामस्थळी सुरक्षेचे योग्य नियम पाळले गेले होते का, याची चौकशी सुरू असून पोलीस आणि संबंधित विभागाने घटनास्थळी तपास सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande