काँग्रेसच्या स्वबळाच्या नार्‍यावर जाधवांचा पलटवार; महायुती एकजुटीनेच – प्रतापराव जाधव
अकोला, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।बिहार मधील कालच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर बुलढाण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. काँग्रेस नावाचा पक्ष आता संपत चालला असून बिहारच्या निकालाने त्
P


अकोला, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।बिहार मधील कालच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर बुलढाण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. काँग्रेस नावाचा पक्ष आता संपत चालला असून बिहारच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान महाराष्ट्रातील जनता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेसला नाकारेल, असा दावा त्यांनी केला. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा निकाल अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याला प्रत्युत्तर देत जाधव म्हणाले की 25 जागांसाठी झालेल्या खर्चापेक्षा अविरोध निवडणूक NDA ला देणे योग्य ठरले असते. मात्र तसं झाल नाही असा खोचक टोला राऊत यांना जाधवांनी लगावला. दरम्यान, स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असल्याने काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती दिसू शकतात. मात्र निकाल काहीही लागला तरी महायुती एकजुटीनेच पुढे सत्तेत राहील, असे केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी अकोल्यात स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande