छ.संभाजीनगर - मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त भाजपची विशेष बैठक
छत्रपती संभाजीनगर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने तसेच भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागाच्या अद्यावत व अत्याधुनिक कार्यालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याच्या तयारीसंदर्
क


छत्रपती संभाजीनगर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने तसेच भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागाच्या अद्यावत व अत्याधुनिक कार्यालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याच्या तयारीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक भाजपा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या बैठकीला छत्रपती संभाजी नगर येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत दौऱ्याचे सर्व कार्यक्रम, स्वागत व्यवस्था, समन्वय, सुरक्षा आणि उद्घाटन सोहळ्याचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करून पुढील कार्ययोजना निश्चित करण्यात आली. मराठवाडा विभागासाठी उभारत असलेल्या नव्या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून संघटन कार्य अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande