बिहार पराभवानंतर आत्मपरीक्षण टाळणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांचा निशाणा
नागपूर,15 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार निवडणुकीतील पराभवानंतर आत्मपरीक्षण न करता सत्ताधारी पक्षावर आरोपांची सरबत्ती करणाऱ्या विरोधकांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला. राहुल गांधी व शरद पवारांसह काही विरोधी नेत्यां
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


नागपूर,15 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार निवडणुकीतील पराभवानंतर आत्मपरीक्षण न करता सत्ताधारी पक्षावर आरोपांची सरबत्ती करणाऱ्या विरोधकांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला. राहुल गांधी व शरद पवारांसह काही विरोधी नेत्यांकडून करण्यात येणारे आरोप निराधार असल्याची टीका त्यांनी केली.

फडणवीस म्हणाले की, निवडणूक हरल्यानंतर हार स्वीकारणे आणि आत्मपरीक्षण करणे आवश्यक असते. परंतु विरोधक हे करण्यात अपयशी ठरत आहेत. ते आत्मपरीक्षण करीत नाहीत तोपर्यंत त्यांची दुर्दशा होत राहील. बिहार निकालानंतर राहुल गांधींनी निवडणूक निष्पक्ष नव्हती असे वक्तव्य केले, तर शरद पवारांनी ‘पैसे वाटून निवडणूक जिंकली’ असा आरोप केला. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “लोकांच्या मनात आमच्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणूनच जनतेने आम्हाला निवडून दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

अजित पवार–अमित शहा भेटीविषयी फडणवीस यांनी सांगितले की ती भेट राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती. राज्यात वाढत्या बिबट्या दहशतीबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबत त्यांनी सांगितले की, विरोधक एकत्र लढो वा स्वतंत्र, महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या जनतेचा महायुतीवरील विश्वास हा निर्णायक घटक आहे. जनतेने महायुतीचा महापौर निवडण्याचा निर्णय घेतल्याचा त्यांनी दावा केला.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande