काँग्रेसने वर्षानुवर्षे आदिवासींची उपेक्षा केली- पंतप्रधान
अहमदाबाद, 15 नोव्हेंबर (हिं.स.) : आदिवासी समाजाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले आहे. परंतु, स्वातंत्र्योत्तर काळात तब्बल 60 वर्षे काँग्रेसने आदिवासींची उपेक्षा केली. त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
गुजरात येथील  जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी


अहमदाबाद, 15 नोव्हेंबर (हिं.स.) : आदिवासी समाजाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले आहे. परंतु, स्वातंत्र्योत्तर काळात तब्बल 60 वर्षे काँग्रेसने आदिवासींची उपेक्षा केली. त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने गुजरातमध्ये आयोजित जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आरोप केला की काँग्रेसने आपल्या प्रदीर्घ सत्ताकाळात आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष केले गेले. त्यांनी सांगितले की सहा दशकांपर्यंत आदिवासी समाजाला त्यांच्या दैनीय अवस्थेतच सोडून देण्यात आले. कुपोषण, शिक्षणाचा अभाव यांसारख्या समस्या तशाच राहिल्या आणि त्या अनेक आदिवासी भागांची ओळख बनून गेल्या आहेत. भाजप सरकारने नेहमी आदिवासी समाजाच्या कल्याणाला प्राधान्य दिले आहे आणि त्यांना सक्षम करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत असे मोदींनी सांगितले.

या कार्यक्रमानंतर मोदींनी सूरत येथे बांधण्यात येत असलेल्या बुलेट ट्रेन स्टेशनचे निरीक्षण केले. हे स्टेशन मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोर (MAHSR) चा एक भाग आहे, जो देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. हा कॉरिडोर सुमारे 508 किमी लांब असून 352 किमी गुजरात आणि दादरा-नगर हवेलीमध्ये, तर 156 किमी महाराष्ट्रात बांधला जात आहे. यामुळे अहमदाबाद, वडोदरा, सूरत, वापी, विरार, ठाणे आणि मुंबई यांसारखी मोठी शहरे एकमेकांशी जोडली जातील. सध्या 326 किमी वायाडक्टचे काम पूर्ण झाले असून 25 पैकी 17 नदीपूल बांधून झाले आहेत.प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई–अहमदाबाद प्रवास सुमारे दोन तासांत करता येईल. ही हाय-स्पीड ट्रेन यात्रा अधिक जलद, सोयीची आणि आरामदायक होईल. सोबतच संपूर्ण कॉरिडोरमध्ये व्यापार, पर्यटन आणि आर्थिक उपक्रमांना मोठी चालना मिळेल.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande