चंद्रपूर : निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या 253
चंद्रपूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका व एका नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या 253 राहणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, घुग्घुस, राजुरा, गडचांदूर, चिमूर, मू
चंद्रपूर : निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या 253


चंद्रपूर, 15 नोव्हेंबर (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका व एका नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या 253 राहणार आहे

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, घुग्घुस, राजुरा, गडचांदूर, चिमूर, मूल, नागभीड येथील नगर परिषद तर भिसी येथील नगर पंचायतीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक होणार आहे. या नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये एकूण प्रभागांची संख्या 133 असून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या 253 आहे. या निवडणुकीसाठी एकूण मतदार लोकसंख्या 3 लक्ष 71 हजार 537 असून यात पुरुष मतदार 1 लक्ष 87 हजार 139 तर स्त्री मतदार 1 लक्ष 84 हजार 387 आहे. अन्य मतदारांची संख्या 11 आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande