एकनाथ खडसेंना धक्का; विश्वासू पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत
जळगाव , 15 नोव्हेंबर (हिं.स.) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून अशातच सत्तेत असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची इनकमिंग सुरूच आहे. आता अशातच जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये
एकनाथ खडसेंना धक्का; विश्वासू पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत


जळगाव , 15 नोव्हेंबर (हिं.स.) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून अशातच सत्तेत असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची इनकमिंग सुरूच आहे. आता अशातच जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे एकनाथ खडसे यांचे जवळचे विश्वासू पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते यांनी, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ऐन नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर खडसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जळगावमधील तीन नगरपंचायतींची जबाबदारी सोपवण्यात आली. यात रावेर, सावदा आणि मुक्ताईनगरची नगरपंचायत आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील चंद्रकांत पाटील यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायचा. पक्ष विस्तार, पक्षाची ताकद वाढवण आणि संघटनात्मक बळकटी या उद्देशाने एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. जबाबदारी मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपली चुणूक दाखवून दिली व एकनाथ खडसे यांना पहिला धक्का दिला.अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष शकील जनाब, युवक अध्यक्ष अशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश केला. हा एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande