लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडले
पाटणा, १५ नोव्हेंबर (हिं.स.) - राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) अध्यक्ष लालू यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी राजकारण आणि कुटुंब या दोन्हींपासून दूर जाण्याची घोषणा केली. यामुळे बिहारच्या राजकारणाला एक नवीन वळण मिळाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत
लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडले


पाटणा, १५ नोव्हेंबर (हिं.स.) - राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) अध्यक्ष लालू यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी राजकारण आणि कुटुंब या दोन्हींपासून दूर जाण्याची घोषणा केली. यामुळे बिहारच्या राजकारणाला एक नवीन वळण मिळाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडीच्या दारुण पराभवानंतर लगेचच ही घोषणा करण्यात आली. ज्यामुळे अंतर्गत असंतोष आणि दीर्घकाळापासून सुरू असलेली गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे.

लालूंच्या समर्थकांपैकी एक असलेल्या रोहिणी यांनी जाहीरपणे तेजस्वी यादव यांचे जवळचे सहकारी (संजय यादव) यांच्यावर पक्षाच्या पतनास कारणीभूत असल्याचा आरोप केला. त्यांच्या या निर्णयामुळे आरजेडीमध्ये खळबळ उडाली आहे. नेतृत्वातील अपयश आणि अंतर्गत गैरव्यवस्थापनावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रोहिणी यांनी सोशल मीडियावर लिहिले, मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबापासून दूर जात आहे... संजय यादव आणि रमीझ यांनी मला हे करण्यास सांगितले आणि मी त्याची जबाबदारी घेत आहे.

रोहिणी यांच्या संदेशामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. रोहिणी यांनी तेजस्वी यांचे थेट नाव घेण्याचे टाळले असले तरी, जवळच्या सल्लागारांचा उल्लेख तेजस्वी यांचे दीर्घकालीन राजकीय रणनीतीकार संजय यादव यांच्यावरील आरोप म्हणून मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

निवडणूक निकालानंतर तेजस्वी यांच्या जवळच्या लोकांविरुद्धचा राग वाढत आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, रोहिणी यांचा उद्रेक हा कुटुंबातील वाढत्या निराशेचा सर्वात सार्वजनिक संकेत आहे. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुका अलिकडच्या काळात पक्षाच्या सर्वात वाईट कामगिरींपैकी एक होत्या, ज्यामुळे आरोप-प्रत्यारोपांची लाट उसळली आहे.

अंतर्गत टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की, तेजस्वी यांच्या निवडणूक निवडी, सल्लागारांच्या एका लहान गटावर जास्त अवलंबून राहणे आणि सदोष धोरणामुळे पारंपारिक मतदार दुरावले आहेत. रोहिणी यांच्या विधानाने या टीकेला आणखी बळकटी मिळाली आहे. संजय यादव आणि कंपनी मुळे पक्षाची घसरण झाली या त्यांच्या टिप्पणीने संघटनेतील तेजस्वी यांच्या राजकीय निर्णयावर दीर्घकाळ प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना आणखी बळकटी मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande