साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदान, २४ भाषांतील बालसाहित्यिकांचा सन्मान
* डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला मराठीसाठी पुरस्कार नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर (हिं.स.) : प्रतिष्ठित साहित्य अकादमीनचे बाल साहित्य पुरस्कार २०२५ चे वितरण आज नवी दिल्ली येथे संपन्न झाले. यात मराठीसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ बाल साहित्यकार व कवी डॉ.
बाल साहित्य पुरस्कार


बाल साहित्य पुरस्कार


* डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला मराठीसाठी पुरस्कार

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर (हिं.स.) : प्रतिष्ठित साहित्य अकादमीनचे बाल साहित्य पुरस्कार २०२५ चे वितरण आज नवी दिल्ली येथे संपन्न झाले. यात मराठीसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ बाल साहित्यकार व कवी डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. डॉ. सावंत यांच्यासह देशातील २४ भाषांमधील साहित्यकारांना हा सन्मान मिळाला. पुरस्कार वितरण सोहळा तानसेन मार्गावरील त्रिवेणी कला संगम येथे पार पडला.

साहित्य अकादेमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून प्रख्यात गुजराती लेखिका वर्षा दास , उपाध्यक्षा कुमुद शर्मा,सचिव पल्लवी प्रशांत होळकर उपस्थित होत्या.प्रत्येक विजेत्याला उत्कीर्ण ताम्रफलक आणि ५०,००० रुपये रोख रक्कम देण्यात आली. पुरस्कारांची घोषणा यापूर्वी १८ जून २०२५ रोजी करण्यात आली होती.

आभाळमाया’चे वैशिष्ट्य आणि डॉ. सावंत यांचे योगदान

डॉ. सुरेश सावंत हे मराठी बाल साहित्यातील दिग्गज नाव आहे. ‘आभाळमाया’मधील कविता मुलांच्या कल्पनाविश्वाला हात घालतात. साधी, भावपूर्ण आणि कल्पनाशील भाषेत लिहिलेल्या या रचना निसर्ग, आकाश, स्वप्ने आणि बालमनाशी जोडलेल्या आहेत. लहान मुलांना आनंद, समज व सौंदर्यदृष्टी देणाऱ्या या कविता त्यांच्या लेखनशैलीचे उत्तम उदाहरण आहेत.

केवळ कवी नसलेले डॉ. सावंत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्य संशोधकही आहेत. ‘बालसाहित्याचा इतिहास’, ‘आंबेडकरी साहित्य’, ‘समाजपरिवर्तनाचे साहित्य’ यांसारख्या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. ‘नंदादीप’, ‘टिंबूपट’ ही पुस्तके वाचकांच्या मनात घर करून आहेत, तर ‘आमच्यामया’ या कादंबरीने बालवाचकांना नवदृष्टी दिली आहे. विद्यापीठ पातळीवर त्यांनी अनेक ग्रंथांचे संपादन व संशोधन केले आहे. मराठी पुरस्कार निवड समितीत श्री. एकनाथ आव्हाड, श्रीमती सोनाली नवांगुळ आणि श्री. लक्ष्मण कडू यांचा समावेश होता.

इतर २३ भाषांमधील विजेते

डॉ. सावंत यांच्यासह असमियासाठी सुरेंद्र मोहन दास (‘मइनाहंतर पद्य’ - कविता), बाङ्लासाठी त्रिदिब कुमार चट्टोपाध्याय (‘एखनउ गाये काँटा देय’ - कहानी), बोडोसाठी बिनय कुमार ब्रह्म (‘खान्थि बोसोन आरो आखु दानाय’ - कहानी), डोगरीसाठी पी.एल.परिहार ‘शौक़’ (‘नन्हींटोर’ - कविता), इंग्रजीसाठी नितिन कुशलप्पाएमपी (‘दक्षिण, साउथ इंडियन मिथ्स अँड फै़ब्लस रीटोल्ड’ - कहानी), गुजरातींसाठी कीर्तिदा ब्रह्मभट्ट (‘टिंचाक’ - कविता), हिंदीसाठी सुशील शुक्ल (‘एक बटे बारह’ - संस्मरण), कन्नडसाठी के. शिवलिंगप्पा हंदिहाल (‘नोटबुक’ - कहानी), कश्मीरीसाठी इज़हार मुबशिर (‘शुरे ते चुरे ग्युश’ - कहानी), कोंकणीसाठी नयना आडारकार (‘बेलाबायचो शंकर आनी हेर काणयो’ - कहानी), मैथिलीसाठी मुन्नी कामत (‘चुक्का’ - कहानी), मलयाळमसाठी श्रीजित मुत्तेडत्तु (‘पेन्गिनुकळुडे वन्करायळ’ - उपन्यास), मणिपुरीसाठी शांतो एम (‘अंगाङ्शिङ्गी शान्बुङ्सिदा’ - नाटक), नेपाळीसाठी साङ्मुलेप्चा (‘शान्ति वन’ - उपन्यास), ओडिआसाठी राजकिशोर पाढ़ी (‘केते फुल फुटिचि’ - कविता), पंजाबीसाठी पाली खादिम (अमृत पाल सिंह) (‘जादू पत्ता’ - उपन्यास), राजस्थानीसाठी भोगीलाल पाटीदार (‘पंखेरुवं नी पीड़ा’ - नाटक), संस्कृतसाठी प्रीति पुजारा (‘बालविश्वम्’ - कविता), संतालीसाठी हरलाल मुर्मु (‘सोना मीरु-वाक् सांदेश’ - कविता), सिंधीसाठी हीना अगनाणी ‘हीर’ (‘आसमानी परी’ - कविता), तमिळसाठी विष्णुपुरम सरवणन (‘ओट्राइचिरगु ओविया’ - उपन्यास), तेलुगुसाठी गंगिशेट्टी शिवकुमार (‘कबुर्ला देवता’ - कहानी) आणि उर्दूसाठी ग़ज़नफ़र इक्बाल (‘क़ौमी सितारे’ - लेख) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande