
टोकियो, 15 नोव्हेंबर (हिं.स.)जपान मास्टर्स २०२५ बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्य फेरीत केंटा निशिमोटोकडून लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत पराभव सहन करावा लागला.कुमामोटो प्रीफेक्चरल जिम्नॅशियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात बॅडमिंटन क्रमवारीत १५ व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्य सेनचा जागतिक क्रमवारीत १३ व्या क्रमांकावर असलेल्या केंटा निशिमोटोकडून एक तास १७ मिनिटांत २१-१९, १४-२१, २१-१२ असा पराभव झाला. निशिमोटोविरुद्ध सेनचा हा सहा सामन्यांतील तिसरा पराभव होता.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेता आणि पॅरिस २०२४ च्या उपांत्य फेरीत पोहोचलेला लक्ष्य सेनने जोरदार सुरुवात केली आणि ८-४ अशी आघाडी घेतली होती. पण निशिमोटोने लवकरच ९-९ अशी बरोबरी साधली.त्यानंतर सामन्यात तीव्र चढ-उतार आले. पण कोणताही बॅडमिंटनपटू आघाडी घेऊ शकला नाही. निशिमोटोने दोन शानदार गुण मिळवत पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये निशिमोटो चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने ७-३ अशी आघाडी घेतली. पण भारतीय बॅडमिंटनपटूने शानदार पुनरागमन केले. आणि पुढील नऊ गुणांपैकी आठ गुण जिंकून मध्यांतराला ११-८ अशी आघाडी घेतली.ब्रेकनंतर आकर्षक रॅली निघाल्या. पण सेनने आपली तीन गुणांची आघाडी कायम ठेवली, सलग चार गुण घेत सामना निर्णायक फेरीत नेला.
निर्णायक सामना एकतर्फी होता, लक्ष्य सेन कोणत्याही क्षणी त्याची लय मिळवू शकला नाही. मध्यांतराला निशिमोटोने चार गुणांची आघाडी घेतली आणि तिथून त्याने हळूहळू आघाडी वाढवत सामना सहज जिंकला.
लक्ष्य सेनने या BWF सुपर ५०० स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली, त्याने क्वार्टर फायनलमध्ये सिंगापूरच्या माजी विश्वविजेत्या लोह कीन यूचा पराभव केला होता. शनिवारचा सामना लक्ष्य सेनचा २०२५ BWF वर्ल्ड टूर हंगामातील तिसरा उपांत्य फेरीचा सामना होता. त्याने यापूर्वी सप्टेंबरमध्ये हाँगकाँग ओपनच्या अंतिम फेरीत आणि ऑगस्टमध्ये मकाऊ ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
लक्ष्य सेनला या वर्षीचा हंगाम अस्थिर राहिला असला तरी, त्याने त्याच्या १९ स्पर्धांपैकी ११ स्पर्धांमध्ये पहिल्या फेरीत पत्करला आहे. त्याने काही प्रभावी विजयांची नोंद केली होती. ज्यात डेन्मार्क ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अँडर्स अँटोनसेनवर विजयाचा समावेश होता.
जपान मास्टर्स २०२५ मध्ये उपांत्य फेरीत पोहोचणारा लक्ष्य सेन हा एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू होता. एचएस प्रणॉय प्री-क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे