दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीवर भारताची मजबूत पकड
कोलकाता, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. रवींद्र जडेजाच्या फिरकी गोलंदाजांनी सामन्यात टीम इंडियाने यशस्वी पुनरागमन केले आहे. भारताचा पहिला डाव १८९ धावांवर आटोपल
रविंद्र जडेजा


कोलकाता, 15 नोव्हेंबर, (हिं.स.)भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. रवींद्र जडेजाच्या फिरकी गोलंदाजांनी सामन्यात टीम इंडियाने यशस्वी पुनरागमन केले आहे. भारताचा पहिला डाव १८९ धावांवर आटोपला होता आणि संघाने ३० धावांची माफक आघाडी मिळवली होती. दुसऱ्या डावात 7 बाद ९३ धावांवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने आपली आघाडी ६३ धावांपर्यंत वाढवली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार टेम्बा बावुमा २९ धावांवर आणि कोबिन बॉश १ धावांवर नाबाद खेळत होते.

पहिल्या डावात भारताला 189 धावांवर रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करावा लागला. रविंद्र जडेजाच्या न फिरकी गोलंदाजाीपुढे पाहुण्या संघाच्या फलंदाजांना फारशी कमाल करता आली नाही. रविंद्र जडेजाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या आहेत. तर कुलदीप यादवने दोन आणि अक्षर पटेलने एक विकेट घेतली. भारताकडे हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा डाव लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल.

दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला झालेल्या दुखापतीमुळे भारताची चिंता वाढली आहे. कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गिल रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या डावात गिलने तीन चेंडू खेळले. पण दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गिलच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की, गिलच्या मानेला दुखापत झाली आहे. आणि बोर्डाची वैद्यकीय टीम त्याची तपासणी करत आहे.

पहिल्या डावात भारताने १८९ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेवर ३० धावांची आघाडी घेतली. भारतीय कर्णधार शुभमन गिल फलंदाजी करताना जखमी झाला आणि रिटायर्ड हर्ट झाला. तो पुन्हा फलंदाजी करू शकला नाही, परिणामी भारताचा पहिला डाव नऊ विकेट गमावून संपला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात १५९ धावा केल्या होत्या.

भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ३९ धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने २९ धावांची खेळी केली. राहुल आणि वॉशिंग्टन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. भारताकडून ऋषभ पंतने २७, रवींद्र जडेजा यांनी २७, अक्षर पटेल यांनी १४, ध्रुव जुरेल यांनी १४, यशस्वी जयस्वाल यांनी १२, कुलदीप यादव यांनी १, मोहम्मद सिराज यांनी १ आणि जसप्रीत बुमराह यांनी नाबाद १ धाव केली. गिल चार धावा काढल्यानंतर रिटायर्ड हर्ट झाला. दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरने चार, तर मार्को जानसेन यांनी तीन विकेट्स घेतल्या. केशव महाराज आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande