आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी अबू धाबीमध्ये होणार
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर (हिं.स.) कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणाऱ्या आयपीएल मिनी लिलावात क्रिकेटपटूंसाठी स्पर्धा करतील अशी अपेक्षा आहे. कारण त्यांच्याकडे दहा संघांपैकी सर्वाधिक पैसे शिल्लक आहेत. के
आयपीएल ट्रॉफी संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर (हिं.स.) कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणाऱ्या आयपीएल मिनी लिलावात क्रिकेटपटूंसाठी स्पर्धा करतील अशी अपेक्षा आहे. कारण त्यांच्याकडे दहा संघांपैकी सर्वाधिक पैसे शिल्लक आहेत. केकेआरने वेंकटेश अय्यर (२३.७५ कोटी) आणि आंद्रे रसेल (१२ कोटी) सारख्या महागड्या क्रिकेटपटूंना रिलीज केले. तर चेन्नई सुपर किंग्जने संजू सॅमसनला विकत घेऊनही अनेक क्रिकेटपटूंना रिलीज करून ४० कोटी रुपये वाचवले. केकेआरला त्यांचा संघ पुन्हा नव्याने तयार करावा लागेल, तर चेन्नई त्यांच्या गोलंदाजी आक्रमणात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. अ‍ॅशेसनंतर उपलब्ध असल्यास ते मथिशा पाथिराणाला परत आणण्याचा किंवा बेन स्टोक्सला विकत घेण्याचा देखील विचार करू शकतात.

केकेआरने क्विंटन डी कॉक, मोईन अली आणि अँरिच नोर्टजे यांनाही रिलीज केले, तर अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंग, हर्षित राणा आणि अंगकृष रघुवंशी यांना कायम ठेवले. केकेआरकडे १३ जागा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये परदेशी क्रिकेटपटूंसाठी सहा जागा आहेत.

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लियाम लिव्हिंगस्टोन आणि लुंगी एनगिडीसह सहा क्रिकेटपटूंना रिलीज केले.दिल्ली कॅपिटल्सने फाफ डू प्लेसिस आणि जॅक फ्रेझर मॅकगर्कसह सहा क्रिकेटपटूंना रिलीज केले.

गुजरात टायटन्सने पाच क्रिकेटपटूंनै रिलीज केले, तर सीएसकेने डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, आर अश्विन आणि पाथिराना यांना रिलीज केले. सनरायझर्स हैदराबादने मोहम्मद शमी, ऍडम झम्पा आणि राहुल चहर यांच्यासह आठ क्रिकेटपटूंना रिलीज केले.

पंजाब किंग्जने ग्लेन मॅक्सवेलसह पाच क्रिकेटपटूंना रिलीज केले. दरम्यान, मुंबई इंडियन्सने नऊ क्रिकेटपटूंना रिलीज केले आहे. लखनऊने तीन क्रिकेटपटूंना रिलीज केले आहे. सर्व रिलीज केलेले क्रिेकेटपटू मिनी लिलावात सहभागी होतील.

यापूर्वी अष्टपैलू रवींद्र जडेजा सीएसकेमधून राजस्थान रॉयल्समध्ये गेला आहे आणि यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन रॉयल्समधून सीएसकेमध्ये गेला आहे. जडेजा रॉयल्समध्ये १८ कोटी रुपयांवरून १४ कोटी रुपयांना गेला आहे, तर सॅमसन त्याच्या सध्याच्या १८ कोटी रुपयांच्या मानधनावर सीएसकेमध्ये सामील झाला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन देखील सीएसकेमधून २ कोटी ४० लाख रुपयांना रॉयल्समध्ये आला आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता सनरायझर्स हैदराबादऐवजी लखनौ सुपर जायंट्सकडून खेळेल, त्याच्या सध्याच्या १० कोटी रुपयांच्या मानधनावर. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबई इंडियन्समधून लखनौ सुपर जायंट्समध्ये गेला आहे, तर नितीश राणा आता रॉयल्सऐवजी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळेल.

मिनी लिलावापूर्वी संघाचे उत्पन्न:

चेन्नई सुपर किंग्ज (४३.४० कोटी)

मुंबई इंडियन्स (२.७५ कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१६.४० कोटी)

कोलकाता नाईट रायडर्स (६४.३० कोटी)

सनराईज हैदराबाद (२५.५० कोटी)

गुजरात टायटन्स (१२.९० कोटी)

राजस्थान रॉयल्स (1६.०५ कोटी)

दिल्ली कॅपिटल्स (२१.८० कोटी)

लखनऊ सुपर जायंट्स (२२.९५ कोटी)

पंजाब किंग्ज (११.५० कोटी)

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande