
जळगाव, 16 नोव्हेंबर (हिं.स.) सोने-चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. अर्थात सोन्याचे भाव २,४०० रुपयांनी घसरून ते एक लाख २३ हजार २०० रुपयांवर आले आहे. चांदीच्याही भावात ४,५०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ५७ हजार ५०० रुपयांवर आली आहे. दोन दिवसांत सोने ३८००, तर चांदी ७३०० रुपयांनी घसरली आहे. जळगाव सुवर्णपेठेत सोन्याचे भाव २,४०० रुपयांनी घसरून ते एक लाख २३ हजार २०० रुपयांवर आले आहे. चांदीच्याही भावात ४,५०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ५७ हजार ५०० रुपयांवर आली आहे. दोन दिवसांत सोने ३८००, तर चांदी ७३०० रुपयांनी घसरली आहे.
सोन्याच्या दागिन्यांची निर्यात २८.४ टक्क्यांनी कमी होऊन ८५०.१५ दशलक्ष डॉलर्स (७,५२०.३४ कोटी रुपये) झाली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत १,१८७.३४ दशलक्ष डॉलर्स (९,९७५.१७ कोटी रुपये) होती. त्याचप्रमाणे, एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान रंगीत रत्नांची निर्यात ३.२१ टक्क्यांनी कमी होऊन २५०.१४ दशलक्ष डॉलर्स (२,१७३.०८ कोटी रुपये) झाली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत २५८.४२ दशलक्ष डॉलर्स (२,१६३.५२ कोटी रुपये) होती. ऑक्टोबरमध्ये चांदीच्या दागिन्यांची निर्यात १६ टक्क्यांनी कमी होऊन १२१.३७ दशलक्ष डॉलर्स (१,०७२.८१ कोटी रुपये) झाली, जी २०२४ च्या याच कालावधीत १४५.०५ दशलक्ष डॉलर्स (१,२१९.०१ कोटी रुपये) होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर