केएसबी लिमिटेड ने तिसऱ्या तिमाहीत नोंदवली मजबूत वाढ
पुणे, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। पंप व वाल्व निर्मिती क्षेत्रातील जागतिक अग्रगण्य कंपनी *केएसबी लिमिटेड*ने 2025 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना, विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प मिळाल्यामुळे आणि मजबूत ऑपरेशनल कामगिरीमुळे एकूणच उल्लेखनीय वाढ झाल्याच
Ksb


पुणे, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। पंप व वाल्व निर्मिती क्षेत्रातील जागतिक अग्रगण्य कंपनी *केएसबी लिमिटेड*ने 2025 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना, विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प मिळाल्यामुळे आणि मजबूत ऑपरेशनल कामगिरीमुळे एकूणच उल्लेखनीय वाढ झाल्याचे सांगितले.

तिमाहीतील मुख्य आर्थिक ठळक बाबी

* *विक्री मूल्य : ₹649.6 कोटी* — गतवर्षीपेक्षा *5.4% वाढ*

* *पहिल्या तीन तिमाहींची एकूण विक्री : ₹1,911.7 कोटी* — वर्षा-वर्ष तुलनेत *5.8% वाढ*

* *इतर उत्पन्न : ₹18.5 कोटी*

* *एकूण खर्च : ₹580.3 कोटी*

* *PBT : ₹87.8 कोटी* (PBT मार्जिन *13.5%*)

प्रमुख व्यावसायिक यश

* मोठ्या *पॉवर प्लांट प्रकल्पासाठी ₹5.33 कोटींचा करार*

* अमेरिकातील आघाडीच्या सुविधेसाठी *₹53.6 कोटींचा एक्स्पोर्ट ऑर्डर*

* राज्य सरकारच्या उपक्रमाखाली *₹34.4 कोटींच्या सोलर पंप प्रकल्पाचे काम*

* राजस्थानातील खाण व ऊर्जा क्षेत्रांसाठी *₹6.5 कोटींचे अत्याधुनिक पंप सोल्यूशन्स*

* गुजरातमधील देशातील पहिले व जगातील मोठे *कार्बन फायबर प्रकल्पासाठी ₹5.6 कोटींचा करार*

* आसाम येथील रिफायनरीसाठी *₹5.8 कोटींचे रेसिप्रोकेटिंग पंप*

* *Etanorm FXM पंपला FM Approval*, फायअर फायटिंग पंप मार्केटमध्ये नवीन संधी

* *KSB Foundry ला NORSOK Phase-1 सर्टिफिकेशन*, मध्य पूर्वेत नवी बाजारपेठ

* कंपनीला *Great Place to Work* सर्टिफिकेशन — *89% सकारात्मक कर्मचारी अभिप्राय*

प्रशांत कुमार – (उपाध्यक्ष, सेल्स व मार्केटिंग,) म्हणाले कि , “ऊर्जा, पॉवर, खाण तसेच रिफायनरी क्षेत्रातील मोठे प्रकल्प मिळाल्यामुळे या वर्षीची आमची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. नवनवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश, तांत्रिक नवकल्पना आणि मजबूत ग्राहकविश्वास यामुळे आमची वाढ अधिक बळकट झाली आहे.”

महेश भावे – (मुख्य वित्त अधिकारी ) म्हणाले कि, “खर्च नियंत्रण, ऑपरेशनल कार्यक्षमता आणि शाश्वतता उपक्रमांमुळे आम्ही नफा आणि स्थिरता कायम ठेवली आहे. 2025 मध्ये आमचा पहिला ‘Sustainability Report’ प्रकाशित करून ESG बाबतीत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.”

*केएसबी लिमिटेड विषयी

1960 मध्ये भारतात स्थापन झालेली केएसबी लिमिटेड ही पंप, वाल्व आणि विविध द्रव वहन प्रणालींच्या निर्मितीमध्ये जागतिक अग्रणी आहे. पॉवर, तेल-उद्योग, बिल्डिंग सर्व्हिसेस, वॉटर ट्रीटमेंट आणि इतर औद्योगिक क्षेत्रांसाठी कंपनी अत्याधुनिक समाधान पुरवते. 2024 मध्ये KSB समूहाचा जागतिक व्यवसाय जवळपास *3 अब्ज युरो* होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande