बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदी पुन्हा उद्धव ठाकरे
मुंबई, १६ नोव्हेंबर (हिं.स.) : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारने शनिवारी या संदर्भात शासन निर्णय क
बाळासाहेब स्मारक उद्धव ठाकरे


मुंबई, १६ नोव्हेंबर (हिं.स.) : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारने शनिवारी या संदर्भात शासन निर्णय काढत ही नियुक्ती अधिकृत केली.

उपरोक्त निर्णयानुसार, उद्धव ठाकरे, माजी मंत्री सुभाष देसाई आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची पाच वर्षे, तर भाजपा आमदार पराग आळवणी, माजी आमदार शिशिर शिंदे आणि यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी ट्रस्टमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय न्यासात पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचे सचिव, प्रधान सचिव, तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतील.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीत उभारण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय स्मारकाची कामे वेगात सुरू असून, नव्या नियुक्त्यांमुळे प्रकल्पाला अधिक दिशा आणि गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील वर्षभरात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जनतेसाठी खुलं होणार असल्याची शक्यता आहे.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी शिंदे गटाने काही महिन्यांपूर्वी केली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली होती. स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा काही संबंध राहता कामा नये. याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे, असेही कदम यांनी म्हटले होते.

दरम्यान आगामी काळात महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. मुंबई महापालिकेची महत्त्वाची निवडणूक जानेवारी महिन्यात होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेतून ठाकरे गटाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपा-शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande