
बीड, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।अंबाजोगाई तालुक्यातील लिंबगाव येथे सुरु असलेल्या जुगार अनुयावर बर्दापूर पोलिसांनी छापा मारला.
या कारवाईत आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख ६४ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंबाजोगाई तालुक्यातील लिंबगाव येथे एका ठिकाणी जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती बर्दापूर पोलिसांना मिळाली होती. पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला.
यावेळी तिरंट नावाचा जुगार खेळताना आठ जणांना. जुगार खेळताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड असा १ लाख ६४ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस हवालदार रामचंद्र केकाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आठ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis