
मालेगाव, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे या गावात एका तीन वर्षीय बालिकेचा अतिप्रसंग करून खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतल्या असून त्याची चौकशी सुरू आहे या घटनेमुळे तालुक्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसापासून सतत जिल्ह्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना या वाढत आहे परंतु त्यातील गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण हे कमी असल्याचे सांगितले जाते. पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यामध्ये अशीच महिला अत्याचाराची घटना घडल्याने जिल्ह्यामध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या संदर्भातील प्राथमिक माहितीनुसार रविवारी सायंकाळी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे भागात ही संताप जनक घटना घडली असून पोलिसांनी माहिती देताना सांगितले की या गावांमध्ये राहणारा शेखर संजय खैरनार हा युवक तालुक्यामध्ये सुतार काम करतो या युवकाने याच गावात राहणाऱ्या तीन वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवले आणि या ठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवरच्या परिसरामध्ये घेऊन गेला . त्या ठिकाणी या मुलीवरती लैंगिक अत्याचार केले त्यानंतर रविवारी सायंकाळी अंधार पडल्यानंतर या मुलीला दगडाने ठेचून मारून टाकले आहे तर या मुलीच्या अंगावरती अनेक जखमा आढळून आले असून त्यामध्ये गळा दाबून मारून टाकल्याचा अंदाज देखील प्रथमदर्शनी व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम कुमार चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावनजी व इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यानंतर या मुलीचा मृतदेह हा मालेगाव येथील प्राथमिक रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला.
या ठिकाणी नातेवाईक व गावकरी संतप्त झालेले होते .त्यांनी संबंधित आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली परंतु पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने आरोपी शेखर संजय खैरनार यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली .त्याने प्रथमदर्शनी पोलिसांना दगडाने ठेचून मारल्याची कबुली दिली आहे. पोलीस या सगळ्या प्रकरणांमध्ये अधिक तपास करीत असून येथील ग्रामस्थ व नागरिकांनी आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी केलेली आहे. हत्या झालेल्या तीन वर्षीय बालिकेचा मृतदेह सोमवारी येथील रुग्णालयातच होता नातेवाईकांनी आरोपीला फाशीची मागणी करून जसे आश्वासनाची मागणी केल्यामुळे मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. पोलीस यासंदर्भामध्ये नातेवाईकांशी चर्चा करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV