
अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।अमरावती जिल्ह्यातील दहा नगर परिषद व दोन नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नामनिर्देशपत्र दाखल करावयाच्या अखेरच्या दिवशी सोमवारपर्यंत (ता. १७) संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नगराध्यक्ष पदासाठी एकूण १२७ तर सदस्य पदाकरीता एकूण १८२१ अर्ज दाखल झाले.
नगराध्यक्ष व सदस्य पदाकरीता (कंसात) नगरपरिषद, नगरपंचायतनिहाय नामनिर्देशनपत्रांची संख्या अचलपूर २२ (३७४), अंजनगावसुर्जी १४ (३०९), दर्यापूर ७(१३९), वरूड १४ (१५५), चांदूररेल्वे ६ (१०९), चिखलदरा ५ (५९), चांदूरबाजार १० (११६), शेंदुरजनाघाट ६ (१०४), धामणगावरेल्वे ३ (५७), मोर्शी १३ (१८२), नांदगाव खंडेश्वर ११ (८७), धारणी १६ (१३०), असे नगराध्यक्षपदासाठी एकूण १२७व सदस्य पदाकरीता १८२१ नामनिर्दे शनपत्र दाखल झालेले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी