निवडणूक निरीक्षकांनी घेतला दर्यापुरात आचारसंहितेचा आढावा
अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.) | विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, निवडणूक निरीक्षक प्रमोद दंडोले यांनी दर्यापूर शहराला भेट देऊन स्थानिक नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा आढावा घेतला. त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आणि कामकाजाचा सखोल अ
निवडणूक निरीक्षकांनी दर्यापुरात आचारसंहितेचा  घेतला आढावा स्थानिक नगरपालिका निवडणुकीच्या तयारीची केली पाहणी


अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.) | विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, निवडणूक निरीक्षक प्रमोद दंडोले यांनी दर्यापूर शहराला भेट देऊन स्थानिक नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा आढावा घेतला. त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आणि कामकाजाचा सखोल अभ्यास केला.

या भेटीदरम्यान, दंडोले यांनी निवडणुकीची सुरक्षा व्यवस्था, आवश्यक मनुष्यबळ आणि एकूण नियोजनाची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीचे कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब दराडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रवींद्रकुमार कानडजे, मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे, दर्यापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी, ठाणेदार सुनील वानखडे आणि सीडीपीओ अमोल मेरगळ यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक निरीक्षक प्रमोद दंडोले यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की, आगामी नगरपालिका निवडणूक निर्भय, निःपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande