
- स्मार्ट होम क्षेत्राला चालना देण्यासाठी गोदरेजची नवी नियो डिजिटल लॉक्स श्रेणी सादर
मुंबई, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। लॉक्स अँड आर्किटेक्चरल सोल्यूशन्स (एलएएस) या गोदरेज एंटरप्रायजेसच्या महत्त्वाच्या विभागाने ‘हर घर सुरक्षित’ उपक्रमाचे 9वे पर्व जाहीर केले आहे. गेल्या आठ वर्षांत या मोहिमेमुळे घरगुती सुरक्षिततेबद्दल मोठी जागरुकता निर्माण झाली आहे. यावर्षी एलएएसने स्मार्ट होम सेगमेंटमधील आक्रमक विस्तारयोजना जाहीर केली असून डिजिटल लॉक्सची श्रेणी 10 पट वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
प्रीमियम भारतीय ग्राहकांसाठी ‘मेड इन इंडिया’ डिजिटल लॉक्समध्ये नाविन्यपूर्ण डिझाइन आणि किफायतशीर किंमतीवर भर दिला जात आहे. कंपनीने डिजिटल लॉक विभागात 36% वार्षिक वाढ नोंदवली असून बाजारात मजबूत आघाडी मिळवली आहे.
उपक्रमाचा भाग म्हणून ‘अपघाती आमंत्रण’ नावाचे अॅपही लॉन्च करण्यात आले आहे. सोशल मीडियावर जास्त माहिती शेअर केल्यास घराच्या सुरक्षिततेवर होणारा धोका हे अॅप दाखवते. मेटाच्या सहकार्याने तयार केलेल्या या एआय-आधारित अॅपद्वारे वापरकर्त्यांना स्कोर आणि सुरक्षिततेसंदर्भात सूचना दिल्या जातात.
गेल्या पाच वर्षांत देशात सोशल मीडिया संबंधित सायबर गुन्ह्यांत तिपटीने वाढ झाली असल्याने गोदरेजने ‘निओ डिजिटल लॉक्स’ ही नवी, किफायतशीर आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त रेंज सादर केली आहे. इन-बिल्ट व्हिडिओ डोअर फोन, वाय-फाय/ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, बहुविध प्रवेश पर्याय, अलार्म आणि आपत्कालीन पॉवर बॅकअप अशी वैशिष्ट्ये असलेली ही रेंज 8,999 रुपयांपासून उपलब्ध आहे.
एलएएस विभागाचे व्यापार प्रमुख श्याम मोटवानी यांनी सांगितले की, “निओ डिजिटल लॉक्स हे आधुनिक भारतीय घरांसाठी स्मार्ट सुरक्षिततेचे नवीन पाऊल आहे.”
आजपर्यंत 1.7 लाखांहून अधिक घरांमध्ये या मोहिमेअंतर्गत सुरक्षितता तपासण्या झाल्या आहेत. 2026 आर्थिक वर्षात 21,000 पेक्षा जास्त तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. डिजीटल सुरक्षा उपायांचा स्वीकार गेल्या वर्षी 30% ने वाढला असून गोदरेज घरगुती सुरक्षेतील नेतृत्व अधिक मजबूत करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule