टाटा ऑटोकॉम्पचा जागतिक विक्रम, दोन वर्षांत तिसरा डेमिंग पुरस्कार!
मुंबई, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह घटक उत्पादक असलेल्या टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेड या कंपनीने अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला डेमिंग पुरस्कार (Deming Prize) सलग दोन वर्षांत तिसऱ्यांदा जिंकून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आह
टाटा ऑटोकॉम्प


टाटा ऑटोकॉम्प


मुंबई, 17 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह घटक उत्पादक असलेल्या टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेड या कंपनीने अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला डेमिंग पुरस्कार (Deming Prize) सलग दोन वर्षांत तिसऱ्यांदा जिंकून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आणि सतत सुधारणा या क्षेत्रातील सर्वोच्च उत्कृष्टतेसाठी हा आंतरराष्ट्रीय सन्मान जगभरातील संस्थांना दिला जातो.

या वेळचा बहुमान टाटा ऑटोकॉम्पच्या व्यावसायिक युनिट टाटा ऑटोकॉम्प हेंड्रिकसन सस्पेंशन्स लिमिटेड यांना प्राप्त झाला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे हे जगातील पहिले व्यावसायिक वाहन सस्पेंशन सिस्टम उत्पादक ठरले आहे, ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी 2024 मध्ये, टाटा ऑटोकॉम्पच्या कंपोजिट्स विभाग आणि टाटा फिकोसा या दोन व्यावसायिक युनिट्सनी देखील डेमिंग पुरस्कारावर आपले नाव कोरले होते.

कंपनीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल बोलताना टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष अरविंद गोयल यांनी आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,“2024 आणि 2025 मध्ये सलग तीन डेमिंग पुरस्कार जिंकणे, हा आमच्या संस्थेमध्ये टोटल क्वालिटी मॅनेजमेंटला सर्वोच्च महत्त्व देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा एक अभिमानास्पद मैलाचा दगड आहे. आम्ही नवीन क्षेत्रे, भौगोलिक बाजारपेठा आणि तंत्रज्ञान यामध्ये विस्तार करत असताना, गुणवत्तेचे व्यवस्थापन ही आमची सर्वोच्च प्राथमिकता राहील. टीक्यूएम हे लोकांचे आंदोलन आहे आणि या प्रवासात आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.” श्री गोयल यांनी इतर व्यावसायिक युनिट्सनी देखील टीक्यूएमचा स्वीकार करून भविष्यात डेमिंग पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत यासाठी कंपनीने महत्त्वाकांक्षी योजना आखल्याचे स्पष्ट केले.

टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कोल्हटकर यांनी या पुरस्काराचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “टोटल क्वालिटी मॅनेजमेंट ही एक लोकचळवळ आहे. डेमिंग पुरस्कार हे दर्शवतो की आम्ही यशस्वीरित्या गुणवत्ता-केंद्रित विचारसरणी, ग्राहक-केंद्रित परिवर्तन आणि गुणवत्ता नेतृत्वाच्या माध्यमातून शाश्वत वाढ कशी साधत आहोत. टाटा ऑटोकॉम्पच्या या विजयाने भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या जागतिक स्तरावरील क्षमतांना पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande