नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये राबवणार कुष्ठरोग शोध अभियान
अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.) :‎नांदगाव खंडेश्वर तालुकाअंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोग शोध अभियानामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्त
नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये राबवणार कुष्ठरोग शोध अभियान:17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान घरोघरी करण्यात येणार सर्वेक्षण


अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.) :‎नांदगाव खंडेश्वर तालुकाअंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोग शोध अभियानामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. त्याची सुरुवात झाली आहे.

समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरूग्णांचा शोध पथकामार्फत घेऊन त्यांचे निदान निश्चित करणे व निदान झालेल्या कुष्ठ रुग्णांना तत्काळ बहुविध औषध उपचार सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने कुष्ठरोग शोध अभियान सुरू केले आहे. हे अभियान १४ दिवसांचे असणार आहे. शोध अभियानाच्या मार्गदर्शनाकरिता एक दिवसीय तालुका स्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये आरोग्य सेवा कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. पूनम मोहोकार यांनी मार्गदर्शन केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे यांनी शोध अभियानाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. समाजांतील निदान न झालेले कुष्ठ रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठ रुग्ण शोधून संसर्गाचा साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करने, विकृतीचे प्रमाण शून्यावर आणणे हा उद्देश आहे. व २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करणे हा आहे, यामध्ये ग्रामीण भागातील सर्व गावांमधील घरांचे सर्वेक्षण करण्यात येणाऱ्या असून सर्व सभासदांचे कुष्ठरोगा बाबत शारीरिक तपासणी केली जाणार आहे. दररोज एका टीम मार्फत त्यांना नेमून दिलेल्या भागात २० ते २५ घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरांतील सर्व सभासदांची तपासणी १०० टक्के करण्यांत येणार आहे. सर्वेक्षण हे तालुका आरोग्य अधिकारी प्राजक्ता वानखडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विस्तार अधिकारी कमल धुर्वे, राजू मेश्राम, आरोग्य सहाय्यक सुरेश बारबुध्दे, आरोग्य सेवक शरद अंबाडकर, आंनद कोराने, अभिजीत वडनेरकर यांच्या सहकार्याने पार पडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande