ओप्पो फाइंड X9 सिरीज भारतात लाँच
मुंबई, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। ओप्पोनं आज भारतात आपली प्रीमियम फ्लॅगशिप फाइंड X9 सिरीज अधिकृतपणे लाँच केली असून, या सिरीजमध्ये ओप्पो फाइंड X9 आणि फाइंड X9 प्रो हे दोन मॉडेल्स आणले आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही फोन मीडियाटेकच्या आतापर्यंतच्या सर्वात
Oppo Find X9 Series


Oppo Find X9 Series


मुंबई, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। ओप्पोनं आज भारतात आपली प्रीमियम फ्लॅगशिप फाइंड X9 सिरीज अधिकृतपणे लाँच केली असून, या सिरीजमध्ये ओप्पो फाइंड X9 आणि फाइंड X9 प्रो हे दोन मॉडेल्स आणले आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही फोन मीडियाटेकच्या आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली डायमेंसिटी 9500 प्रोसेसरसह भारतात येणारे पहिलेच स्मार्टफोन्स ठरले आहेत.

नव्या डिझाइनसह, प्रीमियम बिल्ड क्वालिटी, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि मजबूत बॅटरी यामुळे ही सिरीज चर्चेत आली आहे. यावेळी ओप्पोनं गोलाकार कॅमेरा मॉड्यूलऐवजी वरच्या डाव्या कोपऱ्यात चौकोनी कॅमेरा आयलंड दिला आहे. मेटल फ्रेममुळे फोन हातात अतिशय प्रीमियम वाटतो. दोन्ही फोनना IP68/IP69 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स मिळाली असून डिस्प्लेला गोरिला ग्लास विक्टस 2 चे संरक्षण आहे.

फाइंड X9 मध्ये 6.59 इंचांचा तर X9 प्रो मध्ये 6.78 इंचांचा फ्लॅट अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. 1.5K रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि तब्बल 3600 निट्स पीक ब्राइटनेससह दोन्ही डिस्प्लेमध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट मिळतो. अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही दोन्ही मॉडेल्समध्ये आहे.

सेल्फीसाठी दोन्ही फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, मात्र फक्त प्रो व्हेरियंटमध्ये ऑटोफोकसची सोय आहे. रियर कॅमेरा सेटअपमध्ये फाइंड X9 मध्ये 50MP सोनी LYT-808 मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. तर फाइंड X9 प्रो मध्ये 50MP सोनी LYT-828 मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड आणि तब्बल 200MP Samsung HP5 पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आहे. प्रो व्हेरियंटसाठी ओप्पोनं खास Hasselblad Teleconverter Kit उपलब्ध करून दिलं असून त्यातून 10x ऑप्टिकल झूम मिळू शकतं.

दोन्ही फोन अतिशय शक्तिशाली डायमेंसिटी 9500 चिपसेटवर चालतात आणि कलरओएस 16 (अँड्रॉइड 16 आधारित) प्री-इंस्टॉल्ड मिळतं. हे भारतातील सर्वप्रथम अँड्रॉइड 16 देणारे स्मार्टफोन्स ठरले आहेत. ओप्पोने 5 वर्षांचे ओएस अपग्रेड्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचं आश्वासन दिलं आहे.

प्रचंड बॅटरी, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, वाय-फाय ७, ब्लूटूथ ६.०, एनएफसी, आयआर ब्लास्टर अशी आधुनिक फीचर्स दोन्ही फोनमध्ये आहेत. प्रो मॉडेलमध्ये USB-C 3.2 Gen पोर्ट व खास कॅमेरा शटर की दिली असून दोन्ही फोनमध्ये ‘Snap Key’ फीचर आहे.

किंमती पुढीलप्रमाणे जाहीर झाल्या आहेत —

फाइंड X9 (12GB+256GB) – 74,999 रुपये,

फाइंड X9 (16GB+512GB) – 84,999 रुपये,

फाइंड X9 प्रो (16GB+512GB) – 1,09,999 रुपये,

तर Hasselblad Teleconverter Kit – 29,999 रुपये किंमतीत उपलब्ध असणार आहे.

या सिरीजचा पहिला सेल 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होईल आणि हे फोन ओप्पोची अधिकृत वेबसाइट, अमेझॉन, फ्लिपकार्ट तसेच ऑफलाइन स्टोअर्समध्ये मिळणार आहेत.

कॅमेरा परफॉर्मन्स, नवीन प्रोसेसर आणि दमदार सॉफ्टवेअर सपोर्टमुळे ओप्पोच्या या फाइंड X9 सिरीजने फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत. विशेषत: X9 प्रो मधील 200MP पेरिस्कोप कॅमेरा आणि 10x ऑप्टिकल झूम फोटोग्राफीप्रेमींसाठी मोठं आकर्षण ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande