आयपीएलच्या सलग तिसऱ्या हंगामात पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करणार
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर (हिं.स.)अनुभवी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलमध्ये सलग तिसऱ्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करणार आहेत. सनरायझर्सने आपल्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये याची माहिती दिली. दुखापतीमुळे कमिन्स पर्थमध्ये
पॅट कमिन्स


नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर (हिं.स.)अनुभवी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलमध्ये सलग तिसऱ्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करणार आहेत. सनरायझर्सने आपल्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये याची माहिती दिली. दुखापतीमुळे कमिन्स पर्थमध्ये इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्याला मुकणार आहे. पण ब्रिस्बेनमधील दुसऱ्या सामन्यासाठी तो तंदुरुस्त असण्याची अपेक्षा आहे.

स्टीव्ह स्मिथ २१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. ब्रिस्बेनमधील दुसरी कसोटी ४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कमिन्सने २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या एडेन मार्करामकडून सनरायझर्सचे नेतृत्व स्वीकारले होते. जेव्हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि २०२३ च्या ५० ओव्हर वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या यशानंतर २०२४ च्या आयपीएल क्रिेकेटपटूंच्या लिलावात त्याला फ्रँचायझीने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. कमिन्स यापूर्वी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे.

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावापूर्वी रिटेन आणि रिलीज केलेल्या क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली. कमिन्सला सनरायझर्सने कायम ठेवले आहे. आणि आता त्यांनी त्याचे कर्णधारपद कायम ठेवले आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या क्रिकेटपटूंची यादी:

रिटेन केलेले क्रिकेटपटू: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर समरन, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडेन कार्से, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा, झीशान अन्सारी.

रिलीज केलेले क्रिकेटपटू: अभिनव मनोहर, आर्थव तायडे, सचिन बेबी, मोहम्मद शमी (खरेदी), वियान मुल्डर, सिमरजीत सिंग, राहुल चहर, ऍडम झांपा.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande