अमरावतीत शिवसेना उबाठा व काँग्रेस मध्ये सत्तासंघर्ष पेटणार
अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.) | अंजनगाव सुर्जी नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचंबित करणाऱ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अंजनगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार गजानन
*शिवसेना उबाठा काँग्रेस मध्ये सत्तासंघर्ष पेटणार* दोन्ही पक्षाची एकाच समुदायात मतांसाठी  घुसखोरी


अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.) | अंजनगाव सुर्जी नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचंबित करणाऱ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अंजनगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार गजानन लवटे यांचे सुपुत्र यश लवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी आयशा बानो रशिद खा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले असून काँग्रेस पक्षाने शिवसेना उबाठा गटासाठी राजकीय डाव आखल्याची राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे.

शिवसेना उबाठाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराभूत होण्यासाठी काँग्रेस पक्ष डाव आखत असताना शिवसेना उबाठा पक्षाने राजकीय रणनिती आखून २८ नगरसेवक जागेतील ८ उमेदवार काँग्रेस पक्षाचे वोट बँक समजल्या जाणाऱ्या उमेदवारांना देऊन शिवसेना उबाठा पक्षाने काँग्रेस पक्षाचा डाव हाणून पाडला आहे तर काँग्रेस पक्षावर शिवसेना उबाठा भारी पडलेली दिसून येत आहे.

अंजनगाव नगरपालिका क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे वोट बँक समजल्या जाणाऱ्या एक समुदाय मोठ्या संख्येने असून त्या मतदारांची संख्या नगरपालिका हद्दीत १८ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे या मतदारांवर शिवसेना उबाठा, काँग्रेस या दोन्ही पक्षाचा आपल्याकडे वळविण्याचा डाव होता.

शहरातील सर्वात जास्त संख्येने असलेल्या समुदायातील नगराध्यक्ष पदाची उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली तर शिवसेना उबाठा पक्षाने आठ उमेदवारांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी संधी देऊन त्या समुदायाच्या मतांवर बाजी मारल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगत आहे. शहरातील सर्वात मोठा मतदार असलेला समुदाय अखेर च्या दिवशी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande