
अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी - 2025 लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत, 1 ते 3 डिसेंबर, 2025 दरम्यान महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकांमुळे 1 ते 3 डिसेंबर दरम्यानच्या सर्व लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. 1 डिसेंबर रोजीची परीक्षा ही 20 डिसेंबर, 2025 रोजी होईल. 2 डिसेंबर रोजीची परीक्षा ही 22 डिसेंबर व 3 डिसेंबर रोजीची परीक्षा ही 23 डिसेंबर, 2025 रोजी यापूर्वीच निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्र व दिलेल्या वेळेवर घेण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे. यासंदर्भात सर्व प्राचार्य, केंद्राधिकारी, संबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्र यांना पत्राव्दारे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून, संबंधितांनी याची सर्व विद्यार्थ्यांना जाणीव करुन द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नितीन कोळी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी