
अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.) : शहरातील भुयारी गटार योजनेची कामे गेल्या सहा वर्षात पूर्णतः ठप्प पडलेली आहेत. माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी अॅड. शाहू चिखले यांच्यामार्फत यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुणावणीदरम्यान अमरावती शहराच्या भुयारी गटार योजनेसाठी अमृत योजना का नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली. केंद्रालासुद्धा या जनहित याचिकेमध्ये प्रतिवादी करण्यात यावे व राज्य शासनाच्या नगर विकास विभागासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार आठवड्यात उत्तर सादर करावे, असे न्यायालयाने निर्दे शित केलेले आहे.
महाराष्ट्र शासनाने सर्व विभागीय मुख्यालयापैकी भुयारी गटार योजनेतून एकमेव अमरावती शहराला वंचीतठेवले आहे. गटारे बंदिस्त न झाल्याने उघड्या नाल्यांमुळे शहरातील हजारो नागरिक डेंग्यू, मलेरिया यासारख्या जीवघेण्या आजाराने बळी पडलेले आहेत. २०१४ ते २०१९ या काळात
मंजूर होऊन कार्यारंभ आदेश झालेली कामेसुद्धा पूर्णत्वास नेण्यात प्रशासन व लोकप्रतिनिधी पूर्णतः अपयशी ठरलेले आहेत, असे सांगत माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी अमरावती शहरातील प्रथितयश अधिवक्ता शाहू चिखले यांच्या सहकार्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये रखडलेल्या अमरावती भुयारी गटार योजनेच्या विषयावर महाराष्ट्र शासन, सचिव, पाणीपुरवठा व मलनिस्सारण, सचिव नगर विकास विभाग, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व आयुक्त महानगरपालिका अमरावती यांना प्रतिवादी करून जनहित याचिका दाखल केलेली होती.
न्यायमूर्ती अनिल किलोर व न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या पीठासमोर सुनावणीदरम्यान अमरावती शहराच्या भुयारी गटार योजनेसाठी अमृत योजना का नाही, अशी विचारणा न्यायालयाने राज्य शासनाला केली आहे. तसेच केंद्रालासुद्धा या जनहित याचिकेमध्ये प्रतिवादी करण्यात यावे व राज्य शासनाच्या नगर विकास विभागासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून चार आठवड्यात उत्तर सादर करण्यास निर्देशित केलेले आहे.
कार्यारंभ आदेशानंतरही काम ठप्पअस्तित्वातील ज्या भागात कामे पूर्णत्वास आलेली आहे या भागातील २५,००० नागरिकांचे प्रॉपर्टी कनेक्शन शासनाच्या बचनि भुयारी गटाराला जोडण्यासाठी डॉ. सुनील देशमुख यांनी वर्ष २०१८ मध्ये ५९.५६ कोटी रुपयांच्या निधी मंजूर करून आणला होता. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गेल्या सहा वर्षात हे मंजूर काम पुर्णत्वास नेण्यास सपशेल अपयशी ठरलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी