अर्जुन एरिगेसी बुद्धिबळ विश्वचषकातून बाहेर; कॅंडिडेट स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले
पणजी, 19 नोव्हेंबर, (हिं.स.) - भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी गोव्यातील पणजी येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या पराभवासह कॅंडिडेट स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न भंगले आहे. टायब्रेकमध्ये अर्जुनचा चीनच्या वेई यीने त्याच
अर्जुन एरिगेसी


पणजी, 19 नोव्हेंबर, (हिं.स.) - भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी गोव्यातील पणजी येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या पराभवासह कॅंडिडेट स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न भंगले आहे. टायब्रेकमध्ये अर्जुनचा चीनच्या वेई यीने त्याचा पराभव केला. पहिला सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर चिनी बुद्धिबळपटूने दुसरा सामना जिंकून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले होते.

मंगळवारी अर्जुनने चीनच्या वेई यी विरुद्ध दोन्ही फेरीतील सामने बरोबरीत सोडवले होते. पहिल्या सामन्यात बरोबरी साधल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात वेई यीने काळ्या मोहऱ्यांसह खेळल्याने एरिगेसीला त्रास झाला. पण अर्जुनच्या ३२ व्या चालीनंतर दोन्ही बुद्धिबळपटूंनी बरोबरीवर सहमती दर्शविली.

अलेक्झांडर डोन्चेन्कोचे आव्हानही संपुष्टात आले आहे. उझबेकिस्तानच्या नोदिरबेक याकुबोएव्हने त्याला पराभूत केले तेव्हा त्याने दुसरा सामना बरोबरीत सोडवल्यानंतर १.५-०.५ असा सामना जिंकला. नोदिरबेकने पहिला गेम जिंकला होता.

उझबेकिस्तानचा झावोखिर सिंदारोव्ह आणि मेक्सिकोचा जोस एडुआर्डो मार्टिनेझ अल्कंटारा यांच्यातील दुसरा सामना आणि अमेरिकेचा सॅम शँकलँड, रशियाचा आंद्रे एसिपेंको यांच्यातील दुसरा सामना देखील अनिर्णित राहिला, ज्यामुळे या सामन्यांचा निर्णय टायब्रेकरमध्ये घ्यावा लागला.

भारतीय ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण टायब्रेकमध्ये पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडला. पाचव्या फेरीत मेक्सिकोच्या जोस मार्टिनेझ अल्कंटारा यांच्याकडून त्याचा पराभव झाला. हरिकृष्णा व्यतिरिक्त, विश्वविजेते डी. गुकेश, विदित गुजराती आणि आर. प्रज्ञानंद सुरुवातीच्या फेरीतच बाहेर पडले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande