दक्षिण आफ्रिका 'अ' संघाचा तिसऱ्या वन-डेत ७३ धावांनी विजय
राजकोट, 20 नोव्हेंबर (हिं.स.)भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघांमधील तीन सामन्यांच्या अनौपचारीक एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय फलंदाजी निराश झाली आणि दक्षिण आफ्रिकेने त्याचा फायदा घेत हा सामना ७३ धावांनी
तिलक वर्मा


राजकोट, 20 नोव्हेंबर (हिं.स.)भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघांमधील तीन सामन्यांच्या अनौपचारीक एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय फलंदाजी निराश झाली आणि दक्षिण आफ्रिकेने त्याचा फायदा घेत हा सामना ७३ धावांनी सामना जिंकला. भारतीय कर्णधार तिलक वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमावून ३२५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २५२ धावांवर सर्वबाद झाला. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना भारताने ४ गडी राखून आणि दुसरा ९ गडी राखून जिंकला होता. अशाप्रकारे, भारताने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.

सलामीवीर लुहान ड्राई प्रिटोरियस आणि रिवाल्डो मूनसामी यांच्या शतकांमुळे दक्षिण आफ्रिकेने ६ गडी गमावून ३२५ धावा केल्या. प्रिटोरियसने ९८ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकारांसह १२३ धावा केल्या आणि रिवाल्डोने १३० चेंडूत २ षटकार आणि १३ चौकारांसह १०७ धावा केल्या. या दोघांनी ३७.१ षटकात २४१ धावांची सलामी भागीदारी केली.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आणि दक्षिण आफ्रिकेला ६ बाद ३२५ धावांवर रोखले. खलील अहमद हा भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला, त्याने १० षटकात ८२ धावांत २ बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

३२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताने अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार तिलक वर्मा हे सलामीवीर ५७ धावांनी गमावले. चौथा फलंदाज म्हणून मैदानात आलेला रियान पराग देखील लक्षणीय कामगिरी करू शकला नाही. पराग १७ धावांवर बाद झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande