
नाशिक, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय ॲथलेटिक्स असोसिएशन आणि भारतीय खेळ प्राधिकरण (एसएआय) यांच्या महिलांसाठीच्या महत्त्वाच्या उपक्रम असणाऱ्या अस्मिता लीग या उपक्रमा अंतर्गत संपुर्ण भारत देशामध्ये २६ राज्यामध्ये केवळ ३०० जिल्ह्यात या अस्मिता लीग चे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी नाशिकची निवड झाली आहे. ही बाब नाशिककरांसाठी अभिमानाची आहे.
या स्पर्धेचे आयोजन दिनांक २१ नोव्हेंबर ,२०२५ रोजी नाशिकच्या पंचवटी येथील मिनाताई ठाकरे, विभागीय क्रीडा संकुल येथील सिंथेटिक ट्रॅकवर करण्यात आले आहे.
कमी वयातच मुलींचा जास्तीत जास्त सहभाग वाढवणे, महिला खेळाडूंमध्ये असेलल्या गुणवत्ताचा शोध घेणे, खेळाडूंना स्पर्धेचा अनुभव मिळवून देणे हा या अस्मिता लीग उपक्रमाचा उद्देश आहे.
या टॅलेंटचा शोध घेण्यासाठी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडीयाने टॅलेंट आयडेंटिफिकेशन टीमची नियुक्ती केली आहे. या स्पर्धेत १४ वर्षे मुली आणि १६वर्षे मुली या दोन वयोगतांचा समावेश आहे. यासाठी १४वर्षे गटासाठी खेळाडूंची जन्म तारीख २१डिसेंबर २०११ ते २० डिसेंबर, २०१३ या मधील असावी, तर १६ वर्षे वयोगटातील खेळाडूसाठी खेळाडूंची जन्म तारीख २१ डिसेंबर, २००९ ते २० डिसेंबर,२०११ या मधील असणे आवश्यक आहे. या स्पर्धेमध्ये १४ वर्षे गटासाठी ट्रायथलॉन - अ, ब आणि क प्रकार आहेत. यामध्ये ६० मीटर रन, लांब उडी, उंच उडी, बॅक थ्रो (गोळा) आणि ६०० मीटर धावणे या विविध प्रकारांचा समावेश आहे. तर १६ वर्षे गटासाठीही हे सर्व प्रकार आणि भाला फेक हा प्रकार असणार आहे.
आयोजकांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एक खेळाडूला केवळ आपल्या एकाच वयोगटात आणि केवळ एक क्रीडा प्रकारात भाग घेता येणार आहे.
या स्पर्धेत केवळ नाशिक जिल्ह्यात राहणारे, नाशिक जिल्ह्याचा जन्म दाखला आणि नाशिक जिल्ह्यातील आधार कार्ड असलेले खेळाडूना सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी जन्म दाखल्याचे मूळ प्रमाणपत्र, आधार कार्ड असणे आवश्यक आहे.खेळाडूंनी सहभागासाठी अस्मिता पोर्टल - www.sfwkheloindia.gov.in या माध्यमातून आपला सहभाग निश्चित करावा.अधिक माहितीसाठी प्रशिक्षक वैजयंत काळे मो. क्र. ८३७८८३५९९९, बालाजी शिरफुले मो. क्र. ९८८१४१६५१९, संदीप फुगट मो. क्र. ९६८९३४२९७४, सिद्धार्थ वाघ मो. क्र. ९६५७८७६१९६ यांच्याशी संपर्क करावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV