
टोकियो , 19 नोव्हेंबर (हिं.स.) जपानमधील ओइता शहरातील सागानोसेकी जिल्ह्याला भीषण आगीने ग्रासले आहे. या आगीत 170 पेक्षा जास्त घरे जळून खाक झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत कठीण झाले असून अनेक प्रयत्नांनंतरही ही आग पूर्णतः विझवता आलेली नाही.यामुळे सुमारे 175 जणांनी आपत्कालीन निवाऱ्यांमध्ये आश्रय घेतला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, एक व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हि आग मंगळवारी संध्याकाळी सुमारे 5:40 वाजता (भारतीय वेळेनुसार 8:40 वाजता) लागली होती. अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची बातमी नाही. मात्र, एक व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. जपानच्या या शहरात लागलेल्या आगीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि काळ्या धुराचे प्रचंड लोट दिसून येत आहेत.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, आग इतकी तीव्र होती की ती निवासी भागांपलीकडे डोंगरावरील जंगलांपर्यंत पसरली आहे. याच कारणामुळे दमकल दलासाठी आग विझवणे अधिक कठीण झाले आहे.
जपानच्या पंतप्रधान ताकाइची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आगसंबंधी पोस्ट शेअर करत सांगितले की ओइता प्रांताच्या राज्यपालांच्या विनंतीवरून सैन्याचे अग्निशमन हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode