अमेरिका सौदी अरेबियाला इस्रायलसारखी एफ-३५ लढाऊ विमाने देणार
वॉशिंग्टन, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन डी.सी.मध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये शस्त्रखरेदी करार, इस्राय
अमेरिका सौदी अरेबियाला इस्रायलसारखी एफ-३५ लढाऊ विमाने देणार


वॉशिंग्टन, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन डी.सी.मध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये शस्त्रखरेदी करार, इस्रायलला मान्यता देणाऱ्या अब्राहम करारासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला इस्रायलप्रमाणेच एफ-35 लढाऊ विमाने देण्याची घोषणा केली.

ओव्हल ऑफिसमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणाले, “आम्हाला अब्राहम कराराचा भाग व्हायचे आहे, पण त्याचवेळी आम्हाला दोन-राज्य समाधानासाठी स्पष्ट मार्ग सुरक्षित करायचा आहे.” ते पुढे म्हणाले, “ओसामा बिन लादेनने 9/11 साठी सौदी लोकांचा वापर करून अमेरिका–सौदी संबंध नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता; आम्ही असे पुन्हा कधीही होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.”

ओव्हल ऑफिसमधील चर्चेदरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले की ते सौदी अरेबियाला इस्रायलप्रमाणेच एफ-35 लढाऊ विमाने देतील. ट्रम्प म्हणाले, “जेव्हा तुम्ही एफ-35 पाहाल, ते इस्रायलच्या एफ-35 प्रमाणेच असतील. सौदी अरेबिया आमचा महान भागीदार आहे आणि इस्रायलही आमचा महान भागीदार आहे.”ट्रम्प सध्या सौदी अरेबियाला इस्रायलसोबत संबंध सामान्य करण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ‘अब्राहम अकॉर्ड’ नावाचा एक करार तयार करण्यात आला आहे. या करारांतर्गत बहरीन, मोरोक्को आणि संयुक्त अरब अमिराती यांनी इस्रायलसोबत व्यापारी आणि राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत. ट्रम्प यांचे मत आहे की, जर सौदी अरेबियाने या करारावर स्वाक्षरी केली, तर संपूर्ण अरब जगत त्यात सामील होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande