अमरावतीत संत्रा चोरीच्या सहा सलग घटना; दोन आरोपी अटकेत
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.) | करजगाव शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देऊरवाडा शिवारात संत्रा चोरीच्या सलग सहा घटनांनी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या घटनेत झाडावरील तब्बल एक लाख रुपयांच्या संत्र्यांची चोर
देऊरवाडा परिसरात संत्रा चोरटे सक्रिय  एका आठवड्यात सहा मोठ्या चोरीच्या घटना; लाखोंचा मुद्देमाल गायब


अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.) | करजगाव शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देऊरवाडा शिवारात संत्रा चोरीच्या सलग सहा घटनांनी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या घटनेत झाडावरील तब्बल एक लाख रुपयांच्या संत्र्यांची चोरी झाली होती. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन आरोपीना अटक केली असून त्यांना १७ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर मिळाला होता.

त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच देऊरवाडा परिसरातील शेतामधून झालेल्या दुसऱ्या घटनेत अंदाजे तीन लाख रुपयांचे संत्री अज्ञात चोरट्यांनी पळवली. या दोन्ही घटनांमुळे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकरी श्याम प्रल्हादराव काळबांडे यांच्या २००० झाडांच्या संत्राबागेतून १४ नोव्हेंबरच्या रात्री चोरी झाली. चोरांनी झाडावरून संत्री तोडून नेल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. तपासादरम्यान पोलिसानी दोन आरोपींना अटक केली व पुढील चौकशी प्रगतीपथावर आहे. या घटनेत अंदाजे ३२ हजार संत्र्यांचे (१०० कॅरेट) एवढे मोठे नुकसान झाले. अंदाजे १ लाख रुपये किमतीचे संत्रे नेले गेल्याचे समोर आले आहे.

ताज्या गुन्हे अहवालानुसार, देऊरवाडा मौजेमधील वासुदेव विश्वासराव पाटील (७३, रा. शिरजगाव कसबा) यांच्या ८ एकर शेतीत ११०० झाडे असून येथून १२ नोव्हेंबरच्या रात्री रुपये किमतीची संत्री अज्ञात सुमारे ३ लाख चोरट्यांनी चोरून नेली. ही संत्रे झाडांवर पूर्णपणे पिकलेली असल्याने चोरट्यांनी संधी साधून मोठ्याप्रमाणात तोडणी करून चोरी केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी फिर्यादीच्या जबानीवरून शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यात कः ३७९ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही घटनांमध्ये मिळून ४ लाखांपेक्षा जास्त मूल्याची संत्री चोरट्यांनी लंपास केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्रा हंगाम सुरू असताना अशा चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीती वाढली आहे. संत्रा हंगाम सुरू असताना सलग दोन मोठ्या चोरीच्या घटना घडल्याने शेतकरी भयभीत असून चोरी रोखण्यासाठी अधिक कडक गस्त व तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande