
सोलापूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। ट्रेडिंगमधून दरमहा जादा परताव्याचे आमिष दाखवून सात जणांची 21 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. रंजना रमेश पवार (वय 56, रा. उमानगरी, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे.या संदर्भात पोलिसांच्या माहितीनुसार, रंजना आणि आरोपी राजकुमार विठ्ठल थिटे (वय 42, रा. बार्शी) याची कोकिळा कोळी यांच्या घरी ओळख झाली. ट्रेडिंगमधून दरमहा जादा परताव्याचे आमिष थिटे यांने दाखविले. सुरुवातीला पवार यांनी आठ हजार रुपये दिले. त्यातून दरमहा पैसे देऊन आरोपीने पवार यांचा विश्वास संपादन केला.त्यानंतर थिटे याने एक लाख रुपये दिले तर दरमहा 10 हजार 800 रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर पवार यांनी त्यांच्या बहिणी, तिची दोन मुले तसेच विजय किसन मोरे, एकनाथ चव्हाण, रवी पठारे या सर्वांनी मिळून थिटे यास वेळोवेळी 21 लाख 50 हजार रुपये दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड