प्रणय, आयुष आणि मन्नेपल्ली ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत
कॅनबेरा, १९ नोव्हेंबर (हिं.स.)भारताच्या एच.एस. प्रणय, आयुष शेट्टी आणि थरुन मन्नेपल्ली यांनी ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत प्रभावी विजय मिळवत दुसऱ्या फेरीत स्थान निश्चित केले. २०२३ चा उपविजेता एच.एस. प्र
एच एस प्रणय


कॅनबेरा, १९ नोव्हेंबर (हिं.स.)भारताच्या एच.एस. प्रणय, आयुष शेट्टी आणि थरुन मन्नेपल्ली यांनी ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत प्रभावी विजय मिळवत दुसऱ्या फेरीत स्थान निश्चित केले.

२०२३ चा उपविजेता एच.एस. प्रणयने खराब सुरुवातीतून पुनरागमन करत जागतिक क्रमवारीत ८५ व्या क्रमांकावर असलेल्या जोहान्स सोट मार्सेलिनोचा ६-२१, २१-१२, २१-१७ असा पराभव केला. ५७ मिनिटांत सामना जिंकल्यानंतर, प्रणय आता इंडोनेशियाच्या आठव्या मानांकित अल्वी फरहानशी सामना करणार आहे.

जागतिक क्रमवारीत ३२ व्या क्रमांकावर असलेल्या आयुष शेट्टीनेही चांगली कामगिरी करत कॅनडाच्या सॅम युआनचा २१-११, २१-१५ असा पराभव केला. २० वर्षीय आयुषचा सामना आता जपानच्या चौथ्या मानांकित कोडाई नारोका आणि कॅनडाच्या झियाओडोंग शेंग यांच्यातील सामन्यातील विजेत्याशी होईल.

दरम्यान, थरुन मन्नेपल्लीने डेन्मार्कच्या मॅग्नस जोहानसेनवर २१-१३, १७-२१, २१-१९ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. ६६ मिनिटांच्या सामन्यानंतर, मन्नेपल्लीचा सामना आता पाचव्या मानांकित चिनी तैपेईच्या लिन चुन-यीशी होईल.भारताच्या किरण जॉर्जनेही उत्तम जोश दाखवला पण सहाव्या मानांकित केंटा निशिमोतोकडून २१-११, २२-२४, १७-२१ असा पराभव सहन लागला.

----------------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande