रोहित शर्माने आयसीसी वन-डे क्रमवारीत अव्वल स्थान गमावले
दुबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीता माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माला आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहे. रोहित शर्माने नुकतेच सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावून अव्वल स्थान पटकावले होते. न्यूझीलंडचा डॅरिल
रोहित शर्मा आणि डॅरिल मिशेल


दुबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीता माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माला आपले अव्वल स्थान गमवावे लागले आहे. रोहित शर्माने नुकतेच सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावून अव्वल स्थान पटकावले होते. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल हा आयसीसीच्या ताज्या फलंदाजी क्रमवारीत रोहितला मागे टाकत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात डॅरिल मिशेलने शतक झळकावले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सातवे शतक होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने केलेले शतक त्याला रोहितला मागे टाकण्यासाठी पुरेसे ठरले. मिशेलने अव्वल स्थान मिळवून इतिहास रचला आहे.कारकिर्दीत पहिल्यांदाच डॅरिल मिशेल एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा न्यूझीलंडचा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी १९७९ मध्ये ग्लेन टर्नर आयसीसीच्या फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा न्यूझीलंडचा पहिला क्रिकेटपटू होता.

मार्टिन क्रो, अँड्र्यू जोन्स, रॉजर टोस, नॅथन अ‍ॅस्टल, केन विल्यमसन, मार्टिन गुप्टिल आणि रॉस टेलर यांच्यासह न्यूझीलंडचे अनेक फलंदाज पहिल्या पाचमध्ये पोहोचले आहेत. पण कोणीही पहिल्या क्रमांकावर झेप घेऊ शकले नव्हते.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंनाही आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत अपवादात्मक कामगिरी केली. पाकिस्तानने अलीकडेच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेचा ३-० असा क्लीन स्वीप दिला होता. मोहम्मद रिझवान पाच स्थानांनी झेप घेऊन संयुक्तपणे २२ व्या स्थानावर पोहोचला. फखर जमाननेही पाच स्थानांनी झेप घेऊन २६ व्या स्थानावर पोहोचला.

गोलंदाजांमध्ये अबरार अहमद ११ स्थानांनी झेप घेऊन ९ व्या स्थानावर पोहोचला आहे. वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ पाच स्थानांनी झेप घेऊन २३ व्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान आयसीसीच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande