
वॉशिंग्टन, 19 नोव्हेंबर (हिं.स.)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये एका भव्य डिनरचे आयोजन केले होते, ज्यामध्ये सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान प्रमुख पाहुणे होते. या हाय-प्रोफाइल कार्यक्रमात फुटबॉल सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. रोनाल्डो ईस्ट रूमच्या समोर बसून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, क्राउन प्रिन्स आणि ऍपलचे सीईओ टिम कुक आणि टेस्लाचे संस्थापक एलोन मस्क यांच्यासह इतर जागतिक व्यावसायिक नेत्यांची भाषणे ऐकत होता.
ट्रम्प यांनी आपल्या भाषणादरम्यान, रोनाल्डोचा विशेषतः उल्लेख केला आणि खुलासा केला की, त्यांनी सुपरस्टार फुटबॉलपटूची ओळख आपला मुलगा बॅरनशी करून दिली. ट्रम्प यांनी विनोदाने म्हटले की, बॅरन तुमच्यावर खूप प्रभावित झाला होता. मला वाटते की, मी त्यांची तुम्हाला ओळख करून दिल्याने तो आता त्याच्या वडिलांचा थोडा जास्त आदर करतो. २०१४ पासून रोनाल्डो क्वचितच अमेरिकेला भेट देतो, त्यामुळे ही त्याच्यासाठी दुर्मिळ भेट ठरली आहे.
२०२२ च्या अखेरीपासून रोनाल्डोने सौदी क्लब अल-नासरसोबत करार केला आहे, जिथे त्याचा वार्षिक करार सुमारे २०० दशलक्ष डॉलर्स इतका असल्याचे सांगितले जाते. जूनमध्ये त्याने क्लबसोबत दोन वर्षांचा अतिरिक्त करार केला. जो सौदी अरेबियाच्या सार्वजनिक गुंतवणूक निधीच्या मालकीचा आहे आणि त्याचे अध्यक्षपद क्राउन प्रिन्स बिन सलमान यांच्याकडे आहे.
व्हाईट हाऊसला ही भेट २०१८ नंतर क्राउन प्रिन्स बिन सलमान यांची पहिलीच होती. त्यावेळी पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येनंतर अमेरिका-सौदी संबंध ताणले गेले होते. अमेरिकन गुप्तचर संस्थांना संशय होता की, राजकुमाराने या कारवाईत भूमिका बजावली असावी पण त्यांनी हे आरोप नाकारले आहेत.
२०३४ च्या फिफा विश्वचषकाचे यजमानपद सौदी अरेबियाला देण्यात आले आहे. त्याने म्हटले आहे की, २०३४ चा विश्वचषक हा आतापर्यंतचा सर्वोत्तम असेल. रोनाल्डो पुढील वर्षी होणाऱ्या २०२६ च्या फिफा विश्वचषकात सहाव्यांदा खेळणार आहे. हा एक नवीन विक्रम आहे. पण मिळालेल्या लाल कार्डमुळे रोनाल्डोवर पहिल्या सामन्यातून बंदी घालण्यात येऊ शकते. २०२६ चा विश्वचषक युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये आयोजित केला जात आहे.
ट्रम्प स्वतः २०२६ च्या विश्वचषकात सहभागी आहेत आणि त्यांच्या ओव्हल ऑफिसमध्ये फिफा ट्रॉफीची प्रतिकृती प्रदर्शित करण्यात आली आहे. ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या विश्वचषक सोडतीतही ते उपस्थित राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे