शुभमन गिल भारतीय संघासोबत गुवाहाटीला जाणार
कोलकाता, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान, शुभमन गिल मानेच्या दुखण्यामुळे फलंदाजी करू शकला नाही आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर गिलला डिस्चार्ज देण्यात आला होता. पण दुसऱ्या कसो
शुभमन गिल


कोलकाता, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान, शुभमन गिल मानेच्या दुखण्यामुळे फलंदाजी करू शकला नाही आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर गिलला डिस्चार्ज देण्यात आला होता. पण दुसऱ्या कसोटी सामन्यातील त्याचा सहभाग अनिश्चित राहिला. बीसीसीआयने आता गिलच्या प्रकृतीबद्दल एक नवीन अपडेट दिले आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर त्याच्या दुखापतीची माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

बीसीसीआयने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मानेला दुखापत झाली होती. खेळानंतर त्याला मूल्यांकनासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. शुभमन त्याच्यावर झालेल्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी तो संघासोबत गुवाहाटीला जाईल. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवत राहील आणि त्यानुसार दुसऱ्या कसोटीत त्याच्या सहभागाबाबत निर्णय घेतला जाईल.

मानेला झालेल्या दुखापतीमुळे शुभमन गिल भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकला नाही. कोलकाता कसोटी भारताने ३० धावांनी गमावली होती. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर १२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ दुसऱ्या डावात ९३ धावांवर ऑलआउट झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना २२ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande