
लातूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, क्रीडा अधिकारी कार्यालय, व क्रीडा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये लातूरच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंनी १८ सुवर्ण, २ रजत (रौप्य) आणि ११ कांस्य पदकांसह नेत्रदीपक यश संपादन करत बाजी मारली. विशेष म्हणजे, या अभूतपूर्व कामगिरीमुळे सहा खेळाडूंची निवड राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी झाली आहे.
लातूरच्या संघाने विविध वयोगटांत उत्कृष्ट कामगिरी केली. राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सहा खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे:
. वैभवी मानेसाईप्रसाद जंगवाड
जान्हवी जाधव रोहिणी पाटील माही कुलकर्णीस्मिता गुट्टे
प्रमुख पदक विजेते (सुवर्णपदक):
१९ वर्षांखालील मुली:
वैभवी माने (ईप्पी): वैयक्तिक आणि सांघिक (सुवर्णपदक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड).
दिव्यांका कदम, अदिती चवळे (ईप्पी): सांघिक (सुवर्णपदक).
१९ वर्षांखालील मुले:
हर्षवर्धन सोमवंशी, श्रेयश गरड (ईप्पी): सांघिक (सुवर्णपदक).
१७ वर्षांखालील मुले:
साईप्रसाद जवळ (ईप्पी): सांघिक व वैयक्तिक (दोन्हीमध्ये सुवर्णपदक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड).
१७ वर्षांखालील मुली:
जानवी जाधव (ईप्पी): सांघिक व वैयक्तिक (सुवर्णपदक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड).
रोहिणी पाटील (ईप्पी): सांघिक (सुवर्णपदक).
स्नेहा कश्यप, मयुरी वाघमारे (ईप्पी): सांघिक (सुवर्णपदक).
१४ वर्षांखालील मुले:
वेदांत माने (ईप्पी): सांघिक (सुवर्णपदक).
१४ वर्षांखालील मुली:
स्मिता गुट्टे (ईप्पी): वैयक्तिक (सुवर्णपदक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड).
माही कुलकर्णी, स्मिता गुट्टे, भक्ती बिरादार (ईप्पी): सांघिक (सुवर्णपदक).
रजत व कांस्य पदके:
रजत (रौप्य) पदके:
रोहिणी पाटील (१७ वर्षे मुली, ईप्पी, वैयक्तिक).
गलाले करण (१९ वर्षे मुले, फाईल, सांघिक).
माही कुलकर्णी (१४ वर्षे मुली, ईप्पी, वैयक्तिक).
कांस्य पदके:
वैभवी माने, नंदश्री लहराळे, सिद्धी कदम (१९ वर्षे मुली, फाईल, सांघिक).
वेदांत माने, आशीर्वाद भंडे, सुदर्शन जकवाड, घोगरे विराज (१४ वर्षे मुले, सेबर, सांघिक).
अंकिता मोरे, संस्कृती शिंगडे, यशस्वी दहिफळे (१४ वर्षे मुली, सेबर, सांघिक).
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis