अमरावती : मोर्शीत लोखंडी साहित्य चोरी प्रकरणात दोन चोरटे अटक
अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.) | मोर्शी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून लोखंडी साहित्य चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना मोर्शी पोलिसांनी अटक करून ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. ०३ सप्टेंबर २०२५ रोजी ग्राम मनिमपूर शेतशिवारातील
कोल्हापुरी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा व अप्पर वर्धातील पाईप चोरी प्रकरण उघड; मोर्शी पोलिसांची दोन चोरट्यांना अटक


अमरावती, 19 नोव्हेंबर (हिं.स.) | मोर्शी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून लोखंडी साहित्य चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना मोर्शी पोलिसांनी अटक करून ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.

०३ सप्टेंबर २०२५ रोजी ग्राम मनिमपूर शेतशिवारातील शासकीय कोल्हापुरी बंधाऱ्यावरील ०७ नग लोखंडी प्लेट चोरीला गेल्याची फिर्याद नोंद झाल्यावरून पोलीस स्टेशन मोर्शी येथे अप. क्र. ४९७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दिनांक १२ जुलै २०२५ रोजी अप्पर वर्धा पाटबंधारे उपविभाग, मोर्शी यांच्या वसाहतीतून लोखंडी पाईप व इतर साहित्य चोरीला गेले होते. या प्रकरणी अप. क्र. ३७२/२०२५ कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाला गोपनीय माहिती मिळाल्याने आरोपी राधेश्याम उर्फ ज्ञानेश्वर मोहन धुर्वे (वय ४०, रा. गधेघाटपुरा, मोर्शी) याच्या घरावर दोन पंचासमक्ष झडती घेण्यात आली. त्यावेळी लाकडाखाली लपवलेली कोल्हापुरी बंधाऱ्याची चोरीस गेलेली ०७ लोखंडी प्लेट आढळून आल्या.

विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारासह—चरणदास भिमराव गाडे (वय ३८, रा. गाडगेनगर, मोर्शी)—मनिमपूर येथून प्लेट चोरल्याची कबुली दिली. तसेच जुलै २०२५ मध्ये दोघांनी मिळून अप्परवर्धा कॉलनीतून लोखंडी पाईप चोरी केल्याचेही उघड केले. पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांतील एकूण ४६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande