दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरण : आणखी चार आरोपींना जम्मू-काश्मीरमधून केले अटक
नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर (हिं.स.)।राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) 10 नोव्हेंबरला दिल्लीतील लाल किल्ल्याच्या बाहेर झालेल्या स्फोटप्रकरणी आणखी चार प्रमुख आरोपींना अटक केली आहे. यानंतर या प्रकरणातील एकूण अटक संख्या सहा झाली आहे. पटियाला हाऊस कोर्टात
दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरण : एनआयए पथकाने आणखी चार आरोपींना जम्मू-काश्मीरमधून केले अटक


नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर (हिं.स.)।राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) 10 नोव्हेंबरला दिल्लीतील लाल किल्ल्याच्या बाहेर झालेल्या स्फोटप्रकरणी आणखी चार प्रमुख आरोपींना अटक केली आहे. यानंतर या प्रकरणातील एकूण अटक संख्या सहा झाली आहे. पटियाला हाऊस कोर्टातील जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या आदेशानुसार एनआयए ने चारही आरोपींना जम्मू आणि काश्मीरमधून ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुजम्मिल शकील गनई, रहिवासी: पुलवामा (जम्मू-काश्मीर) डॉ. अदील अहमद राथर, रहिवासी: अनंतनाग (जम्मू-काश्मीर) डॉ. शाहीन सईद, रहिवासी: लखनऊ (उत्तर प्रदेश) मुफ्ती इरफान अहमद वागे, रहिवासी: शोपियां (जम्मू-काश्मीर) या चार जणांना एनआयए ने अटक केली आहे.

एनआयए च्या चौकशीनुसार, या सर्वांनी या दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्फोटात 15 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जखमी झाले होते. यापूर्वी तपासात वेग आणत एनआयएने आमिर रशीद अली, ज्याच्या नावावर स्फोटात वापरण्यात आलेली कार नोंदणीकृत होती आणि जसीर बिलाल वानी उर्फ दानिश, ज्याने हल्ल्यात सहभागी दहशतवाद्याला तांत्रिक मदत दिली होती या दोन आरोपींना आधीच अटक केली होती. आरसी-21/2025/NIA/DLI या प्रकरणातील संपूर्ण दहशतवादी कट रचनेचा पर्दाफाश करण्यासाठी दोघांची चौकशी सुरू आहे.

एनआयए ने सांगितले की तपास जलदगतीने पुढे जात आहे आणि येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होऊ शकतात. या मॉड्यूलमधील इतर सदस्य आणि त्यांच्या सपोर्ट नेटवर्कचा शोध घेण्यासाठी तपास, छापे आणि चौकशीची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande