
नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर (हिं.स.)।भारत इस्रायली कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि भागीदारीच्या व्यापक संधी प्रदान करत आहेत, ही माहिती भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी आपल्या इस्रायल दौऱ्यात दिली. गोयल यांनी सांगितले की दोन्ही देश उद्योगांचे पायाभूत सुविधा विकास, उत्पादन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा भविष्याभिमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी वेगात वाढवू शकतात.
गोयल यांनी स्पष्ट केले की सहकार्याचे इतर संभाव्य क्षेत्रांमध्ये फिनटेक, अॅग्री-टेक, मशीन लर्निंग, क्वांटम कॉम्प्युटिंग, औषधनिर्माण (फार्मास्युटिकल्स), अवकाश तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्राचा समावेश आहे. भारत–इस्रायल व्यापारी शिखर परिषदेतील भाषणात गोयल म्हणाले, “दोन्ही देशांमधील शक्यता असीम आहेत.” ही पहिलीच वेळ आहे की एखादे भारतीय वाणिज्य मंत्री अधिकृत इस्रायल दौऱ्यावर गेले आहेत. गोयल ६० सदस्यीय व्यापारी प्रतिनिधीमंडळासह इस्रायलमध्ये पोहोचले असून, या दौऱ्यात ते सरकारी आणि व्यावसायिक नेतृत्वाशी भेटून द्विपक्षीय व्यापार व गुंतवणूक वाढवण्याच्या उपायांवर चर्चा करतील.
गोयल म्हणाले की भारताला गुंतवणुकीसाठी आकर्षक केंद्र बनवणारे “१० डी” आहेत—लोकशाही, जनसांख्यिकीय लाभांश , डिजिटलीकरण, जलद गतीने विकास, निर्णायक नेतृत्व आणि इतर महत्त्वाचे घटक. ते पुढे म्हणाले, “भारत गुंतवणूकदार आणि उद्योगांसाठी अत्यंत अनुकूल वातावरण प्रदान करतो. यामुळे दोन्ही देशांच्या उद्योगांसाठी प्रचंड संधी निर्माण होतात.”
इस्रायलचे अर्थमंत्री नीर बरकत यांनीही भारताला ‘उत्कृष्ट भागीदार’ असे संबोधले. त्यांनी म्हटले, “भारत ही पुढील मोठी जागतिक शक्ती आहे .भारतीय पायाभूत सुविधा कंपन्या इस्रायलमध्ये येऊन मोठ्या प्रकल्पांसाठी बोली लावू शकतात.” बरकत यांनी भारत–मध्य पूर्व–युरोप आर्थिक कॉरिडॉर (आयएमईसी) चा उल्लेखही महत्त्वाच्या सहकार्याच्या संधी म्हणून केला. आयएमईसीचा उद्देश भारत, सौदी अरेबिया, अमेरिका आणि युरोप यांना रस्ता, रेल्वे आणि समुद्री मार्गांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे जोडणे आहे. यामुळे आशिया, मध्य पूर्व आणि पाश्चात्त्य देशांमधील व्यापारिक एकात्मता वाढेल. या उपक्रमाला सप्टेंबर 2023 मध्ये दिल्लीतील जी 20 शिखर परिषदेत अंतिम रूप देण्यात आले होते.
बरकत म्हणाले, “ आयएमईसी हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे.” व्यापार आकडेवारी - 2024–25 मध्ये भारताचा इस्रायलला निर्यात 52% घसरून 4.52 अब्ज डॉलरवरून 2.14 अब्ज डॉलर झाला.त्याच कालावधीत आयात 26.2% घसरून 1.48 अब्ज डॉलरवर आली. एप्रिल 2000 ते जून 2025 दरम्यान भारताला इस्रायलमधून 337.77 दशलक्ष डॉलरचा प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (FDI) मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode