राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या परीक्षा नव्‍या वेळापत्रकाप्रमाणे 2 डिसेंबरला होणार
मुंबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.) - राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या (एनआयओएस) वतीने ऑक्टोबर - नोव्हेंबर 2025मध्‍ये घेण्‍यात येणाऱ्या सार्वजनिक परीक्षेची सुधारित, नवीन तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे 6 नोव्हेंबर रोजी
राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था


मुंबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.) - राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या (एनआयओएस) वतीने ऑक्टोबर - नोव्हेंबर 2025मध्‍ये घेण्‍यात येणाऱ्या सार्वजनिक परीक्षेची सुधारित, नवीन तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे 6 नोव्हेंबर रोजी घेण्‍यात येणार होती. परंतु बिहार राज्यातील निवडणुकांमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. ही परीक्षा आता येत्या 2 डिसेंबर (मंगळवार) रोजी पुन्हा नियोजित करण्यात आली आहे.

सर्व संबंधित विद्यार्थी आणि पालकांना सुधारित तारखेची नोंद घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती आणि सुधारणा केलेले वेळापत्रक यासाठी, विद्यार्थ्यांनी अधिकृत एनआयओएसच्या पोर्टलला भेट द्यावी - https://sdmis.nios.ac.in/registration/home-notifications आणि https://rcpune.nios.ac.in/

कोणत्याही आणखी मदतीसाठी, विद्यार्थी एनआयओएस प्रादेशिक केंद्र,पुणे येथेही संपर्क साधू शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande