भारतात ४०० दिवसांत ५० हजारांहून अधिक विकली गेली विंडसर ईव्ही इलेक्ट्रिक कार
मुंबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने भारतात इलेक्ट्रिक कारांच्या विक्रीचा एक मोठा टप्पा पार केला आहे. एमजी मोटर्सने विंडसर ईव्ही (Windsor EV) च्या 50,000 युनिट्सची विक्री केली असून, ही विक्रीची संख्या गाठण्यासाठी कंपनीला फक्त
भारतात ४०० दिवसांत ५०,००० हून अधिक विकली गेली विंडसर ईव्ही इलेक्ट्रिक कार


मुंबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने भारतात इलेक्ट्रिक कारांच्या विक्रीचा एक मोठा टप्पा पार केला आहे. एमजी मोटर्सने विंडसर ईव्ही (Windsor EV) च्या 50,000 युनिट्सची विक्री केली असून, ही विक्रीची संख्या गाठण्यासाठी कंपनीला फक्त 400 दिवस लागले. म्हणजेच, या कारच्या भारतीय बाजारात लाँच झाल्यापासून देशभरात दर तासाला या कारच्या पाच युनिट्सची विक्री झाली आहे. एमजी मोटर्सचा दावा आहे की विंडसर ईव्ही ही भारतात सर्वात वेगाने 50 हजार विक्रीचा आकडा गाठणारी इलेक्ट्रिक कार बनली आहे.

भारतामध्ये एमजी विंडसर ईव्ही ला मोठी लोकप्रियता मिळत आहे. परंतु या इलेक्ट्रिक कारच्या पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा नेक्सॉन ईव्ही, टाटा पंच ईव्ही, ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक आणि महिंद्रा XUV400 या गाड्या तिला कडवे स्पर्धक आहेत. महिंद्रा बीई ६ आणि टाटा कर्व ईव्ही यांनाही या इलेक्ट्रिक कारचे राइवल मानले जाऊ शकते.एमजी विंडसर ईव्हीमध्ये परमानंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर दिली आहे. या गाडीत 38 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. या बॅटरीसह ही ईव्ही सिंगल चार्जमध्ये 331 किलोमीटरची रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे. गाडी 136 पीएस ची पॉवर आणि 200 Nm टॉर्क निर्माण करते. या इलेक्ट्रिक कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

एमजी मोटर्सने या गाडीत प्रवाशांच्या सुरक्षेलाही विशेष महत्त्व दिले आहे. कारमध्ये 6 एअरबॅग्ज देण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकसह रियर पार्किंग सेन्सर्सही दिले आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) चे फीचरही उपलब्ध आहे. एमजी मोटर्सच्या या कारमध्ये 7-इंचाचा फुली डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. कारमध्ये क्रूज कंट्रोल तसेच फुली ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल सिस्टम देखील आहे. एमजी विंडसर ईव्ही ची एक्स-शोरूम किंमत 14 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 18.39 लाख रुपयांपर्यंत जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande