
कोलकाता, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।बांग्लादेशात भूकंप झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्येही शुक्रवारी सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ५.५ अशी नोंदवली गेली आहे. भूकंपाचे केंद्र बांग्लादेशातील दुंगी येथे होते, पण त्याचे धक्के कोलकात्यापर्यंत जाणवले. सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी धक्के बसले आणि घाबरलेले लोक घराबाहेर पडले. सध्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नाही, पण तीव्रता जास्त असल्याने लोक घाबरून गेले.
युरोपियन–मेडिटेरेनियन सिस्मोलॉजी सेंटरच्या माहितीनुसार, भूकंपाचे एपिसेंटर बांग्लादेशातील टुंगीपासून सुमारे 27 किलोमीटर पूर्वेला होते. त्याची खोली अंदाजे 10 किलोमीटर होती. कोलकात्यासह आसपासच्या जिल्यांमध्ये आणि उत्तर बंगालमध्येही धक्के जाणवले. कूचबिहार आणि दिनाजपूरमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के नोंदवले गेले. दरम्यान, पाकिस्तानमध्येही आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानमध्ये जोरदार भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, पहाटे पाकिस्तानमध्ये रिक्टर स्केलवर 5.2 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. भूकंपाचे केंद्र अंदाजे 135 किलोमीटर खोलीवर होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode